"सरकारच्या बदली धमक्यांना घाबरत नाही, बदलीनामा स्वीकारूनही संप अविरतंच राही"

Started by Atul Kaviraje, December 11, 2021, 12:30:30 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

  विषय : नांदेड  येथे  ST कर्मचाऱ्यांनी , सरकारने  केलेल्या  बदल्यांबद्दल  निषेधात्मक  घोषणा  दिल्या . आमच्या  बदल्या  जाणून -बुजून  केल्यात. या  बदल्याना , या  बदल्यांच्या  धमक्यांना आम्ही  घाबरत नाही .
            वास्तव -ST कर्मचाऱ्यांच्या  बदल्यांविरुद्ध  निषेध  घोषणा  - चारोळ्या   "सरकारच्या बदली धमक्यांना घाबरत नाही,बदलीनामा स्वीकारूनही संप अविरतंच राही"
--------------------------------------------------------------------------


(1)
महिना  उलटून  गेलाय , ST कर्मचाऱ्यांच्या  या  तीव्र  संपाला, या उग्र आंदोलनाला 
सरकारही तेवढंच  आहे  ढिम्म , जणू  दगडाची  मूर्ती , उभी  अचल , अटल
या  पत्थरास  पाझर  फुटतंच  नाही , एवढं  कसं  काय  हो  हे  निगरगट्ट  ?
आता  दोघांपैकी  कोणीतरी  एकाने , सोडावा  अंती  हा  मनो -निग्रही  हट्ट  !

(2)
सरकार  आता  खंबीर  पाऊल  उचलतंय , टोकाची  भूमिका  घेतंय
संपकरी  ST कर्मचाऱ्यांच्या  त्वरित  "बदल्यांचे"  पत्र , ते  त्यांच्या  हाती  देतंय
निर्णय  घेता  येत  नाही  म्हणून , कोणाचाही  राग ते  कोणावरही  काढतंय ,
हातातल्या  सत्तेचा ,अधिकाराचा  गैरवापर  करून , ST कर्मचाऱ्यांच्या  "बदलीचे"  हुकूम  देतंय .

(3)
ST कर्मचाऱ्यांच्या  संपाला ,आंदोलनाला  आता , अति -तीव्र  वळण  लागलंय
"बदलीपत्र"  हाती  घेऊन  ते , सरकारच्या  नावाने  शिमगा ,बोंबाबोंब  करताहेत
म्हणताहेत , कुठेही  करा ,कितीही  करा  "बदल्या" , आम्ही  त्याला  भीत  नाही ,
जाणून -बुजून  केलेल्या  या  "बदल्याना" , आम्ही  मुळात  भिकचं  घालीत  नाही .

(4)
म्हणताहेत , आमचे  हे  आंदोलन  असेच  राहील  सुरु , होवोत  आमच्या "बदल्या" कुठेही
जिथे  आहोत  तिथून  पुन्हा  नव्याने  करू  सुरु , यात  तिळमात्र  नाही  शंकाही
निर्णय  नाही  घेता  येत  म्हणून , हे  "बदलीचे"  ढोंग  आम्हा  पुरते  माहीत  आहे ,
जिथे  आहोत  तिथून  पुन्हा , आमची  नव्याने  एकी, एकजूट   होत  आहे .

(5)
ST कर्मचाऱ्यांनी  आता  सरकार  निषेधार्थ  घोषणा -बाजी  सुरु  केली  आहे
"बदलीच्या"  कारणांस्तव , त्यांची  ही  नारेबाजी  अधिकच  तीव्र  होऊ  लागली  आहे
करून  करून  कुठे  कराल  "बदली" , आपली  भेट  महाराष्ट्रातच  होणार  आहे ,
आमचा हा विलीनीकरणासाठीचा  निर्णयात्मक  लढा, साऱ्या पंचक्रोशीत  गाजणार आहे .

(6)
आपापले  "बदली" -पत्र  संपकारी  ST कर्मचारी , एकमेकांना  दाखवीत  होते
सरकारच्या  या  अजब  निर्णयाचे  ते , कुत्सितपणे ,उपहासाने  स्वागत  करीत  होते
म्हणत  होते , या "बदली" -धमक्यांना , या  बागोलबुवाला , भ्यायला  आम्ही  काही  कुक्कुली  बाळे  नाहीत ,
आता  तुम्हाला  नवा  धडा  शिकविण्या , आम्ही  एक  नवी  शाळा  उघडणार  आहोत .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.12.2021-शनिवार.