म्हणी-"गरज सरो नि वैद्य मरो"

Started by Atul Kaviraje, December 11, 2021, 06:13:26 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "गरज सरो नि वैद्य मरो"


                                              म्हणी
                                           क्रमांक-91
                                     "गरज सरो नि वैद्य मरो"
                                    -----------------------


91. गरज सरो नि वैद्य मरो
    ---------------------

--आपले काम झाले की उपकार कर्त्याची पर्वा न करणे.
--ज्याने आपली गरज भागविली त्याला विसरुन जाणे.
--गरज असेपर्यंत त्या माणसाशी संबंध ठेवणे व गरज संपल्यावर त्याला विसरुन जाणे.
--संस्कृतपर्यायः - 1 कार्यार्थी सर्वलोकोऽयम्। 2 सङ्कटे व्यङ्कटेश I
आपले काम झाले की ते करून देणाऱ्याशी काहीही संबंध न ठेवणे.
--स्वार्थी मनुष्य दुसऱ्यांचा विचार करत नाही.
--गरज असे पर्यंतच एखाद्याची आठवण ठेवणे, गरज संपली की त्याला विसरणे.
--आपले काम झाले की मदत करणाऱ्याची पर्वा न  करणे.
--आपले काम संपताच उपकार करत्याला विसरणे.
--वैद्याची जरूरी असते तोपर्यंत त्‍याच्याकडे खेपा,पण एकदां रोग बरा झाल्‍यावर त्‍याच्याकडे जाणें किंवा भेट घेणें अजीबात बंद. कारणच तेवढे असते. यावरून गरजेपुरता संबंध ठेवणें. खरी आपुलकी, प्रेम नसणें. 'गरज सरतांचि वैद्या त्‍यजिती
होती गळां प्रथम हार। आपण होउनि तृप्त, त्‍यजिती अतृप्त स्‍त्रियांसही जार।।'-मोमंत्र १०.५९८. उपाध्यायश्र्च वैद्यश्र्च ॠतुकाले वरस्‍त्रियः। सूतिका दूतिका नौका कार्यान्ते ते च शष्‍पवत्‌।-सुर १५७.१५. (गु.) गरज सरो, वैद मरो
गरज सरी के वैद (देव) वैरी.


                    (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  --------------------------------------------


                        गरज सरो, वैद्य मरो-कथा क्रमांक-१---
                       --------------------------------

     एकदा एका श्रीमंत माणसाचा एकुलता एक मुलगा खूप आजारी पडला. तऱ्हेतऱ्हेचे वैद्य केले. साधू संतांचे उपाय केले, तरी उतार पडेना. शेवटी एक विद्वान वैद्य त्याचेकडे आला. त्याने मुलाला तपासले व बरे करण्याची हमी दिली. तेव्हा त्या श्रीमंताने वैद्यराजांना सांगितले, "वैद्यराज! माझ्या मुलाला काही करून बरे करा. तुम्ही जर माझ्या मुलाला बरे केलेत तर माझी सर्व इस्टेट मी तुम्हाला देईन. वैद्यराजांनी खूप मेहनत करून एका महिन्यात त्याच्या मुलाला पूर्ण बरे केले आणि त्या श्रीमंतास आपले वचन पाळण्यास सांगितले. आता तो गृहस्थ बदलला. वैद्याला म्हणाला, "वैद्यराज! भलतेच काय मागता? आपणाला वेड तर लागले नाही ना! अहो, त्रासलेला माणूस असे बोलून जातो, ते सगळे खरे मानायचे असते का? माझ्या मुलाची स्थिती पाहून मी त्यावेळी वेडा झालो होतो आणि त्या वेडाच्या भरात मी आपणास भलतेच काही कबूल केलेही असेल. पण वेडेपणात दिलेले वचन शहाणपणात पाळायचे नसते'. त्याने त्या वैद्याला काहीही दिले नाही.

तात्पर्य : जगात माणसे गरजेपुरते काहीही कबूल करतात. गरज सरली, की सोयीस्करपणे बदलतात.

--अक्षय रेहान 
-------------

                (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीगोष्टी .ए पी के स्टुटस.इन)
               ------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.12.2021-शनिवार.