म्हणी-"गर्जेल तो पडेल काय ?"

Started by Atul Kaviraje, December 12, 2021, 05:53:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "गर्जेल तो पडेल काय ?"


                                            म्हणी
                                         क्रमांक-92
                                   "गर्जेल तो पडेल काय ?"
                                  -----------------------


92. गर्जेल तो पडेल काय ?
    ---------------------

--केवळ गाजावाजा करणार्‍या व्यक्तीच्या हातून फारसे काही घडत नसते.
--केवळ बडबड करणाऱ्या माणसाकडून काहीही कृती होत नाही.
--फक्त तोंडाने बोलणाऱ्या माणसाकडून काही होत नाही.
--संस्कृतपर्यायः -गर्जन्त: नैव वर्षन्ति। - जो फक्त बोलतो, बढाया मारतो तो काम करत नाही.
--मोठमोठ्या गोष्टी करणारे लोक मुळात काहीही काम करत नाहीत.
--केवळ गाजावाजा किंवा बडबड करणार्‍या व्यक्तीच्या हातून काही कार्य घडत नसते.
--नुसत बोलणं कृती काही नाही.
--(गर्जेल तो वर्षेल काय?) - केवळ बडबड करणा-या माणसाच्या हातून कोणतेही कार्य होऊ शकेल का?
--केवळ बडबड करणारा माणूस, काही विशेष करू शकत नाही.
-- केवळ बडबड करणाऱ्याच्या हातून कोणतेही कार्य घडत नाही.
--गर्जेल तो पडेल (वर्षेल) काय, बोलेल तो करील काय-ज्‍याचा गडगडाट होतो तो मेघ पाऊस देत नाही, तो कोरडाच जातो. त्‍याचप्रमाणें जो शेखी मिरवितो, बडबड करतो, त्‍याच्या हातून काम होत नसते.-शाब १.५ 'गरजणें' पहा.
--जो बोलेल तो करील काय-जो नुसता बडबड करतो त्‍याच्या हातून प्रत्‍यक्ष कृति काही एक होत नाही. उदा०- जे ढग नुसते गडगडतात त्‍यांचेपासून पाऊस पडत नाही.


                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                  -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.12.2021-रविवार.