चारोळ्या-"प्राणी मित्रच झाल्यात आजी सूर्यवंशी,बोलतात त्या या अनाथ प्राण्यांशी"

Started by Atul Kaviraje, December 14, 2021, 12:20:03 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : ठाणे , चंदनवाडी येथे  राहणाऱ्या  सूर्यवंशी  आजीनी , आपल्या  घरी  मुक्या , अनाथ , बेवारशी , भटक्या  प्राण्यांना  सांभाळण्यासाठी  आश्रम  उघडला  आहे . त्यात  कुत्री , मांजरी , कासव  हे  प्राणी राहतात  , शिवाय  त्या  कावळे ,चिमण्या ,पोपट  आदी  पक्ष्यांचीही  देखभाल  करताहेत . गेली  १५  वर्षे , त्या  हे  भूत -दयेचे  कार्य  स्वखर्चाने  आणि  इतर  घरांची  घरकामे  करून  करताहेत .
                        प्राणी -मित्र  सूर्यवंशी आजी-चारोळ्या
       "प्राणी मित्रच झाल्यात आजी सूर्यवंशी,बोलतात त्या या अनाथ प्राण्यांशी"
--------------------------------------------------------------------------


(1)
कुत्री ,मांजरी ,कासवानी  सारं  घर  भरलंय  "आजी  सूर्यवंशींच"
कावळे ,चिमण्या ,पोपट  येतात  सारे  नित्य  खिडकीशी ,कवाडांशी
पोटच्या  पोराप्रमाणेच  त्या  करतात  प्रेम , देतात  त्यांना  माया ,
या  "अनाथ" ,बेवारशी, मूक  प्राणी -पक्ष्याना  , त्या  दाखवत  आल्यात  दया .

(2)
ठाणे -चंदनवाडी  येथील  या  प्राणी -सेविका , गेली  १५  वर्षे  सेवा  देताहेत
मुक्या  प्राण्यांना  कोणीही  नाही , पण  मी  आहे  त्यांची ,निक्षून  सांगताहेत
हेटाळीत ,तिरस्कारित ,हड -तुड , झालेले  हे  प्राणी  त्या  घरी  आल्यात  सांभाळत ,
स्व -खर्चाने ,घरकामे  करून  इतरांची , त्या  रहाताहेत  त्यांच्या  मुखी  घास  घालत .

(3)
या  "अनाथ"  प्राण्यांत  त्यांनी  देव  पाहिलाय ,म्हणती  माणूस  आहे  राक्षसच
हे  प्राणी  जागतील  खाल्या  अन्नाला , करतील  रक्षण ,पण  मनुष्य  आहे  भक्षकच
ममता  देतात ,माया  करतात , त्यांना  लहान  मुलांप्रमाणेच  त्या  जपतात ,
अश्या  अनेक  विभूती  लाखांमध्ये , फक्त  एक  आणि  एकचं  असतात .

(4)
या  प्राणी -पक्ष्यांसवे  त्या  बोलतात ,आपली  सुख -दुःखे  त्यांना  सांगतात
प्रेमाने  जवळ  घेऊन  त्यांना  कुरवाळतात , त्यांच्यावर  सुरकुतलेला  हात  फिरवतात
असे  हे  मनुष्य -प्राण्याचे  अनोखे  प्रेम , सध्या  ठाण्यात  चर्चेत  आहे ,गाजत  आहे ,
नगर -सेवकाच्या  हस्ते , "सूर्यवंशी  आजींचा"  प्राणी -मित्र  म्हणून , बहुमान  होत  आहे .

(5)
काहींच्या  डोळ्यांत  आश्चर्य  आहे ,काहींच्या  कौतुक ,तर  काहींच्या  तिरस्कार
आजी  गेल्यात  या  सर्वांपलीकडे , त्यांनी  केलाय  भूत -दयेचा  अंगीकार
माझ्यात  देव  आहे , तसा  तो  त्यांच्यातही  आहे ,हे  संत -वचन  त्या  खरे  करताहेत ,
लोकांकडे  दुर्लक्ष  करून  त्या  हे  अनोखे  प्राणी  सेवेचे  कार्य , पार  पाडताहेत .

(6)
एक  आदर्श  आहेत  "आजी  सूर्यवंशी" , आता  कलियुगात  कुणी  मिळेल  का  ?
स्वतःच्या  रक्ताची  नाती  तोडणारा  माणूस, या मुक्या प्राण्यांना कधी जवळ घेईल का ?
देवदूत  दिसतोय  "आजींमध्ये"  मला ,अभय  दिलयं  त्यांनी  या  अनाथ  प्राण्यांना ,
असं  काय  आहे या  "आजींमध्ये" , अजुनी  प्रश्न  पडतोय  मनी  काहींना .

(7)
त्यक्त ,त्यज्य ,"अनाथ" ,पोरक्या  मुलांना , असती  अनाथा -श्रम ,अनाथालय
पण  या  मुक्या ,"अनाथ"  प्राणी -पक्ष्यांना  कुणी  कधी  दिलयं  का (घर) आलय  ?
आजींची  मुलगीही  त्यांचा  हI  वारसा  नेटाने  पुढे  चालवतेय ,
प्राणी  आणि  मनुष्य  या  दोघांमध्ये  एक  नव्या  नात्याची  सुरुवात  होतेय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.12.2021-मंगळवार.