"१५-डिसेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, December 15, 2021, 11:14:10 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१५.१२.२०२१-बुधवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "१५-डिसेंबर – दिनविशेष"
                                   -------------------------


अ) १५ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.
   -----------------------------

१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.

१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.

१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.

१९७०: व्हेनेरा-७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले.

१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.

१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.

१९९१: चित्रपट दिगदर्शक सत्यजित रे यांना ऑस्कर पारितोषिक जाहीर झाले.

१९९८: बॅंकॉक येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमध्ये सलग तिसरे सुवर्णपदक मिळाले.

२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली

=========================================

ब) १५ डिसेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

३७: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८)

६८७: पोप सर्गिअस (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)

१८३२: फ्रेंच वास्तुरचनाकार, आयफेल टॉवरचे निर्माता आणि अभियंता गुस्ताव अलेक्झांद्रे आयफेल यांचा जन्म.  (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)

१८५२: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)

१८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)

१८९२: गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक जे. पॉल गेटी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९७६)

१९०३: स्वामी स्वरुपानंद यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)

१९०५: साहित्य अकादमी पुरकर विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि शिक्षणशास्त्रज्ञ इरावती कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)

१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.

१९३२: प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म.

१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.

१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)

१९३५: पार्श्वगायिका व संगीतकार उषा मंगेशकर यांचा जन्म.

१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.

१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.

=========================================

क) १५ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.
   ---------------------------

१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.

१९५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)

१९६६: मिकी माऊस चे जनक वॉल्ट इलायान डिस्ने यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १९०१)

१९८५: मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री शिवसागर रामगुलाम यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९००)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.12.2021-बुधवार.