चारोळ्या-"१०४वर्षांच्या तरुण कुटीअम्माआजी,प्रेरणादेती दुसऱ्या शिकण्याकरिती राजी"

Started by Atul Kaviraje, December 16, 2021, 01:45:07 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

  विषय : केरळ  येथील  १०४  वर्षांच्या कुटीअम्मा  आजींनी  साक्षरता  परीक्षा  पास  केली .
                                   प्रेरणादायी चारोळ्या 
     "१०४ वर्षांच्या तरुण कुटीअम्मा आजी,प्रेरणा देती दुसऱ्या शिकण्या करिती राजी"
--------------------------------------------------------------------------


(1)
वयाचे  बंधन  नाही ,अट  नाही ,मर्यादा  नाही , म्हणती  "कुटीअम्मा  आजी"
शिक्षण  घेता  येते  केव्हाही , मी  आहे  "१०४  वर्षांची"  माझ्या  पणतूची  पणजी
साक्षरता  परीक्षा  होताहेत  पास , केरळातल्या  या  "१०४  वर्षांच्या"  विदुषी ,
आहे  तोवर  मी  धडे  राहीन  गिरवीत , माझे  बोलणे  झालेय  तसे  देवाशी .

(2)
शाळेत  कधीचं  गेल्या  नाहीत , घरची  परिस्थिती  अनुकूलच  नव्हती
मोठे  कुटुंब , मोठी  जबाबदारी , यातच  गेली होती  त्यांची  हयाती
केरळातल्या  छोट्या  गावच्या  या  ग्रामस्थ , पाठीत  वाकलेल्या  "आजी" ,
सांगती  उत्साहाने , आठवण  करताहेत  त्या  दिवसांची  नाही  करीत  अजीजी .

(3)
पोक  आलंय  पाठीला ,तरी  मनाचा  कणा  त्यांचा  ताठ  आहे
नातू -पणतू  बरोबर  अक्षरे  गिरवतात , त्यांच्या  हाती  पुस्तकाचा  पाठ  आहे
तेव्हा  नाही  शिकता  आलं , आता  मी  ती  हौस  भागवून  घेत  आहे ,
नातू -पणतू  बरोबर  मी  आज  पाटीवर ,वहीवर  अक्षरे  गिरवीत  आहे .

(4)
"१०४  वर्षांच्या  आजींनी"  आजवरल्या  साऱ्या  वृद्धांचा  रेकॉर्डच  ब्रेक  केला  आहे
साक्षरता  परीक्षा  करून  पास , त्यांनी  केरळचा  मान  वाढविला  आहे
त्यांच्या  या  जिद्दीला  माझा  सलाम , त्यांच्या  या  कर्तबगारीला  माझे  प्रणाम ,
"कुटीअम्मा  आजी"  आहेत  आदर्श , साक्षर झाल्यात , त्या नाहीत  कुणाच्याही गुलाम .

(5)
दीर्घायुषी  या  "आजींनी"  आजवर  अनेक  पाहिलेत  उन्हाळे -पावसाळे
जीवनात  बऱ्या -वाईट  गोष्टींच्या  आहेत  त्या  साक्षीदार ,ऋतू  पाहिलेत  त्यांनी  सगळे
सर्व  गोष्टी  पाहून , जाणून  घेतल्यात , फक्त  उरी  एवढीच  खंत  होती ,
दिवसच  तसे  होते , मुलींना  शाळेत  जाण्याची ,शिकण्याची  भ्रांत  होती .

(6)
आज  त्या  समाधानी ,आनंदी  आहेत , साक्षर  आहेत ,त्यांना  वाचनही  येतंय
द्रष्ट्या आहेत  त्या ,विचार  करताहेत ,त्यांना  उद्याचही  जग  दिसतंय
"कुटीअम्मा  आजींनी"  खचून  न  जातI , या  वयातही  काही  करून  दाखवलंय ,
शरीर  सुरकुतलेल  आहे  म्हणून  काय  झालं ,तरुण मनाने  हे सिद्ध करून दाखवलंय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-16.12.2021-गुरुवार.