चारोळ्या-"माझा सर्जा-राजा दिसतोय कसा देखणा,शर्यत गाजवील यंदाची असा त्याचा बाणा"

Started by Atul Kaviraje, December 18, 2021, 01:53:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : बैलगाडा  शर्यत  सुरु  करण्यास  सुप्रीम  कोर्टाने  परवानगी  दिली . जल्लोषपूर्ण  वातावरणात  कोर्टाच्या या  निर्णयाचे  स्वागत  केले  गेले . साऱ्या  महाराष्ट्रभर  आनंदाची  लाट  पसरली . २०१४  साली  बंदी  आणलेला  हा  कायदा , या  महिन्यात  नोव्हेंबर -२०२१ , रोजी  ओपन  केला  आहे . बळीराजाने   आपल्या  सर्जा -राजाचे  प्रेम  जिंकले  आहे . या  आनंदात  गुलाल , भंडारे  उधळले  गेले , फटाके  फुटले  आणि  मिठाईचेही  वाटप  करण्यात  आले .
                      बैलगाडा  शर्यत  पुन्हा  एकदा  सुरु -चारोळ्या
  "माझा सर्जा-राजा दिसतोय कसा देखणा,शर्यत गाजवील यंदाची असा त्याचा बाणा"
--------------------------------------------------------------------------


(1)
सुप्रीम  कोर्टाने  दिलीय  आनंदाची  बातमी ,शेतकऱ्यांस ,बळीराजास
उठवलीय  बंदी  "बैलगाडा  शर्यतींवरची" , काही  नियम  करून  पास
त्रास  होईल  "बैलांना"  असे  वर्तन , घडतI  कामI  नये  तुमच्याकडून ,
या  मुक्या  प्राण्यांचे  शर्यतीत  हाल  होऊ  नयेत,  कळत -नकळत  गाडीवानांकडून .

(2)
२०१४  साली  बंदी  घातलेला  हा  कायदा , कोर्टाने  आज  मोडून  काढलाय
२०२१  चा डिसेंबरचI महिना ,आनंदाची  बातमी , सुवार्ता  घेऊन  आलाय
फटाके  फुटताहेत ,गुलाल -भंडारे  उधळताहेत ,मिठाईचे  वाटप  होतंय ,
एकमेकांना  पेढे  भरवत  शेतकरी -दादाचे  "बैलांवरील"  प्रेम  व्यक्त  होतंय .

(3)
शेतकऱ्याचे  "सर्जा -राजा"  आज  सजलेत ,दिमाखात  उभे  आहेत  शर्यतीत
मान  वेळावताहेत ,जागच्या  जागी  नाचताहेत ,अंग  हलवताहेत  होऊन  आनंदित
वर्षभर  काबाडकष्ट  करणाऱ्या  "बैलांचा"  आज  विशेष  दिन  आहे ,
शेतकरी  आपल्या  दिमाखदार  जोडीस , प्रेमाने  डोळे  भरून  पहात  आहे .

(4)
गावागावांत आज "बैलगाडा शर्यतीचे" आयोजन होत आहे,आनंदाची लाट  पसरली  आहे
"बैलांना" न्हाऊ -माखू  घातलं  जातंय,त्यांचं  पूजन  होतंय ,त्यांना  तयार  केलं  जातंय ,
त्या  मूक  प्राण्यालाही  समजतंय , माझा  मालक  माझ्यावर  माया  करतोय  तितकीच ,
जितकी  शेतात  नांगर  ओढतानाही  मला  जास्त  त्रास  होऊ  नये  इतकीच .

(5)
शेतकरी आपल्या "सर्जा-राजाला" प्रेमाने कुरवाळतोय,पाठीवरून त्यांच्या हात  फिरवतोय
बऱ्याच  दिवसांनी  आलेल्या  या  पर्वणीचे , तो यथार्थ  स्वागत  करतोय
स्वतःचे  विसरून  दुःख  तो , त्याच्या  "बैलांना"  शर्यतीसाठी  तयार  करतोय ,
आजचा  दिवस  आहे  तुमचा  बाळांनो , प्रेमाने ,जिव्हाळ्याने  तो  त्यांना  सांगतोय .

(6)
चौखूर  उधळलेल्या  माती -आड , "बैलांच्या"  आकृत्या  अस्पष्ट  होत  धावताहेत
धुरळा  खाली  बसताच , "बैल" -जोडी  जिंकल्याच्या आनंद -वार्ता  कानी  येताहेत
बक्षीस घेण्या गर्वाने ,अभिमानाने , प्रत्येक  शेतकरी  आपल्या  "बैलांसवे" , रिंगण  परिक्रमा  करताहेत ,
"बैलांच्या" गळ्यातील  घुंगुर -माळाही  आज , आनंदाने  खूळूखुळू  वाजताहेत .

(7)
आज  पेटा  नाराज  आहे , कोर्टाच्या  निर्णयावर निराश  आहे
मूक  प्राण्यांवर  होणाऱ्या  अन्यायाची ,त्रासाची  त्यांनी  नेहमीच  कड  घेतली  आहे
या  सर्वांविरुद्ध  जाऊन ,निषेधार्थ  पेटा  आज  काळा -दिन  पाळत  आहे ,
पण  हा  "बैलांवर"  होणार  अन्याय  नसून , त्यांचा  तो  जणू  सन्मानच  आहे .

(8)
शेतकरी -दादा  आज  समाधानी  आहे ,त्याचा  तो  मित्र  त्याला  परत  गवसलाय   
गेली  ७  वर्षे , असलेल्या  बंदिवासातून , आज  त्याचा  "बैल"  मुक्त  झालाय
जल्लोषपूर्ण  वातावरणात  वाजत -गाजत  शेतकरी  आपल्या  "बैलांची"  दृष्ट  काढतोय ,
त्याचा  "सर्जा -राजाही" , मान  हलवून  आपला  मूक -आनंद  व्यक्त  करतोय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.12.2021-शनिवार.