IIश्री गणेशाय नमःII-"श्री गणेश संकष्टी चतुर्थी"

Started by Atul Kaviraje, December 22, 2021, 11:05:09 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II श्री गणेशाय नमः II
                                        "श्री गणेश संकष्टी चतुर्थी"
                                      -------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज बुधवार  दिनांक-२२.१२.२०२१ , संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, ऐकुया एक गणेश गीत - "रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत" 

     पंचांगानुसार, पौष महिन्याची पहिली आणि 2021 वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी ही आज (22 डिसेंबर 2021) आहे. Sankashti Chaturthi December 2021 : पंचांगानुसार, पौष महिन्याची पहिली आणि 2021 वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी ही आज (22 डिसेंबर 2021) आहे. या दिवशी अनेक शुभ योग आहेत.

     संकष्टी चतुर्थी 2021 | बुधवारी आलेल्या वर्षातील शेवटच्या संकष्टी चतुर्थीचं महत्त्व काय ? जाणून घ्या पूजा आणि चंद्रदर्शन मुहूर्त---

     पौष महिना सुरू झाला आहे. पौष महिन्याच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते.  या वर्षातील शेवटचा संकष्टी चतुर्थी व्रत 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

     भगवान गणेशाला बुद्धी आणि सौभाग्याची देवता म्हणून पूजले जाते. संकष्टी म्हणजे अडचणींपासून मुक्ती. असे मानले जाते की भगवान गणेश भक्तांच्या समस्या दूर करतात आणि अडथळे दूर करतात. हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार, प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरी केली जाते.

    पौष महिना सुरू झाला आहे. पौष महिन्याच्या चौथ्या दिवशी संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते.  या वर्षातील शेवटचा संकष्टी चतुर्थी व्रत 22 डिसेंबर रोजी होणार आहे.

     या दिवशी चंद्राच्या पूजेचे विशेष महत्त्व मानले जाते. हा दिवस बुधवारी पडत असल्याने पूजेचे महत्त्व अधिकच वाढले आहे. जे लोक या दिवशी विधिवत गणेशाची पूजा करतात त्यांचे सर्व संकट दूर होतात. जाणून घेऊया संकष्टी चतुर्थी व्रत, पूजा मुहूर्त आणि चंद्रदर्शन मुहूर्त.

                संकष्टी चतुर्थी डिसेंबर 2021 तारीख---

पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 22 डिसेंबर बुधवार आहे.

                  संकष्टी चतुर्थी डिसेंबर 2021 तारीख वेळ---

चतुर्थी तिथी 22 डिसेंबर रोजी दुपारी 04:52 वाजता सुरू होईल आणि 23 डिसेंबर रोजी संध्याकाळी 06:27 वाजता समाप्त होईल.

                  संकष्टी चतुर्थी डिसेंबर 2021 पुजेच्या वेळा---

या दिवशी इंद्र योग दुपारी 12.04पर्यंत आहे, संकष्टी चतुर्थी व्रत इंद्र योगात ठेवला जाईल. संकष्टी चतुर्थी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत आहे. या दरम्यान तुम्ही गणेशाची पूजा करू शकता.

                                चंद्रदर्शन मुहूर्त---

चंद्र दर्शन मुहूर्त – रात्री 08.30 ते रात्री 09.30 पर्यंत राहील.

                       संकष्टी चतुर्थी 2021 : महत्त्व---

     संकष्टीचा संस्कृत अर्थ म्हणजे संकटातून मुक्ती किंवा अडथळे आणि प्रतिकूल काळापासून मुक्ती. संकष्टी चतुर्थी हा गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात शुभ दिवस मानला जातो. वर नमूद केल्याप्रमाणे, या दिवशी भगवान शिवाने आपला पुत्र गणेशला सर्व देवांमध्ये श्रेष्ठ म्हणून घोषित केले. कोणतीही विधी किंवा नवीन उपक्रम सुरु करण्यापूर्वी गणपतीची पूजा केली जाते. त्याची ज्ञानाची देवता म्हणूनही पूजा केली जाते आणि ते विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध आहे.

--मृणाल  पाटील
----------------

                                       गणपती बाप्पा गीत
                                    "श्री गणेश संकष्टी चतुर्थी"
                           "रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत"
                          --------------------------------------


रचिल्या ऋषी मुनींनी ज्याच्या ऋचा अनंत
डंका विनायका रे झडतो तुझा दिगंत.

वरदायका गणेशा महदाशया सुरेशा
का वेध लाविसी तू हेरंब एकदंत.

येसी जळातुनी तू, कोणा कळे न हेतू
अजुनी भ्रमात सारे योगी मुनी महंत.

मढ मंदिरात येती, जे जे अनन्य भक्त
ते सर्व भाग्यवंत होतात पुण्यवंत.


--गायिका : लता मंगेशकर.
------------------------


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टीव्ही९मराठी.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.12.2021-बुधवार.