पनामा प्रकरण -चारोळ्या-"सुनेच्या पाठी लागलेत ED,सासूबाई करी संसदेत आरडा-ओरडी"

Started by Atul Kaviraje, December 23, 2021, 02:04:23 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : सुनबाईंविरुद्ध  ED पनामा  पेपर -फुटीचा  पुरावा  गोळा  करतेय , त्याच  वेळी  सपाच्या  खासदार  सासूबाई , संसदेत  प्रत्येकाला  श्राप  देताहेत , आरडा -ओरडा  करताहेत . का  तर त्यांच्या सुनेवर  कुणा  खासदाराने  बोट  उठवले  आहे . याचा  खर  म्हणजे  काहीही  बादरायण  संबंध  नाही .
              पनामा  पेपर -फुटी (PEPAR LEAK) प्रकरण -चारोळ्या
          "सुनेच्या पाठी लागलेत ED,सासूबाई करी संसदेत आरडा-ओरडी"
--------------------------------------------------------------------------


(1)
महानायक ,शतक -अभिनेता , सुप्रसिद्ध ,गाजत  होता तेव्हा,सरत  आलीय  सदी
वृद्धत्त्व आलय,निवृत्ती झालीय ,पण  दिसतोय एखाद्या समारंभात,कार्यक्रमात अधी -मधी
गाजलेली अभिनेत्री "सुनबाई" त्याची,रूप-गर्विता ,रूप-सुंदरी ,दिसतेय जणू राणी-परी ,
अर्धांगिनीही अभिनेत्री तेव्हाची संसदेत मुख्य भूमिका घेऊन सपाची गाजवतेय खासदारकी

(2)
या  सुखी कुटुंबाला लागलंय  गालबोट ,दृष्ट  लागलीय , कुणाची  तरी  नजरच  लागलीय
पहाता -पहाता  बातमी  सर्व  वर्तमानपत्रांत  प्रथम  स्थानी  झळकू  लागलीय
"सुनबाईच्या" कारवाया उघडकीस  आल्यात ,तिच्यापाठी  हात  धुवून  लागलेत  "ED",
ठपका ठेवल्यामुळे,मनास ठेच लागल्यामुळे,"सासूबाई"देताहेत श्राप,संसदेत करताहेत  आरडा -ओरडी .

(3)
बादरायण  संबंध  लावला  जातोय ,कशाचा  कशालाही  नाहीय  मेळ ,नुसताच  खेळ
"सुनबाईला" ठेवलेल्या नावामुळे,"सासूबाई"भडकल्यात खासदारांवर संसदेत,वाया  चाललंIय  वेळ
पहाता -पहाता  कुटुंबाची  वाताहत  उडालीय,दैना झालीय, मोठेपणा  गोत्यात  आलाय ,
कारणंच  तस  घडलय,  या  उच्चभ्रू  कुटुंबाचा  कारभार  चक्क  चव्हाट्यावर  आलाय .

(4)
कोणे  एके  काळी,एक  डोकेबाज  माणूस  वस्तीस  परदेशी  पनामा  शहरी
बेहिशेबी  मालमत्ता ,लपवलेली  संपत्ती ,इस्टेटीची  तो  कागदोपत्री  गणना  करी
धंदे काळे त्याचे,लपविण्या काळे कारभार,चुकविण्या INCOME-TAX,नसलेल्या कंपन्या उघडी ,
जगभरातील  उच्चभ्रू  समाज ,सेलिब्रिटी ,प्रतिष्टीत ,श्रीमंत  व्यक्तींची  तो  भरमारी  करी .

(5)
२०१६ साली विख्यात पनामा शहराची कुख्यात म्हणून  बदनामी  झाली ,नाचक्की  झाली
रॅकेट उघडकीस येऊन ,१  कोटी  १५  लाख  (PEPAR LEAK) पेपरांची  फुटी  झाली
सारे दस्तावेज,काळ्या कारभारांचे वृत्त,गैर-व्यवहार प्रकाराचे, सापडले विरोधी संस्थेच्या  हाती ,
इतकी वर्षे जपलेले नाव,प्रतिष्ठा,शान,मान ,इज्जत  याची  क्षणार्धात  झाली  होती  माती .

(6)
महानायकाचे  अन  "सुनबाईंचेही"  नाव  गुंतलयं ,पनामा  गैर -व्यवहार  प्रकरणी
आता निघताहेत सगळे काळे कारभार बाहेर,"ED"-च्या दरबारी लागतेय या  प्रतिष्टितांची वर्णी
तेव्हाचे  प्रकरण  आता  येतंय  उघडकीस ,नुसता  तमाशाच  होऊन  राहिलाय ,
मोठा  मासा  पहा  कसा  या  प्रकरणात ,"ED"-च्या  जाळ्यात  गवसलाय .


(7)
नको  ते  ऐश्वर्य ,नको  तो  मोठेपणा ,आपली  साधी -सुधी  नोकरी  बरी
महिन्याकाठी  न  चुकता  भरावा  INCOME-TAX, नकोय  कोणाची  शिरजोरी
दूर  राहावे काळ्या  जगतापासून ,कारभारापासून , अंथरूण  पाहून  हात -पाय  पसरी ,
सन्मानाने जगावे ऐसे जीवन,कुणीही दाखवता कामा नये बोट,चालू न देता कुणाचीही  मुजोरी .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.12.2021-गुरुवार.