आंदोलन-चारोळ्या-"जमिनीखाली गाडूनघेतोय स्वतःला,आक्षेप घेऊन वीजकनेक्शन तोडण्याला"

Started by Atul Kaviraje, December 25, 2021, 02:54:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : जालना  येथील  जाफराबाद  तालुक्यात , गरीब  शेतकऱ्यांच्या  घराचा  विजेचा  पुरवठा  खंडित  केल्यामुळे , तालुकाध्यक्ष  आणि  स्वाभिमानी  संघटनेचे  पदाधिकारी  श्री .मयूर  बोर्डे  यांनी , शेतकऱ्यांना  पाठिंबा  आणि  सरकारचा  (वीज -खात्याचा) निषेध , म्हणून  स्वतःला  जमिनीत  गळ्यापर्यंत  गाडून  घेऊन  अनोखे -अजब  आंदोलन  केले .
         जमिनीखाली  गळ्यापर्यंत  गाडून  घेऊन  अनोखे  आंदोलन - चारोळ्या
      "जमिनीखाली गाडून घेतोय स्वतःला,आक्षेप घेऊन वीज कनेक्शन तोडण्याला"
--------------------------------------------------------------------------


(1)
अनोखे  आंदोलन  आज  मिळत  होते  पाहावयास ,जालन्यात -जाफराबाद  तालुक्यात
स्वतःला  गाडून  घेतले  होते "मयूर  बोर्डेनी" ,जमिनीत  गळ्यापर्यंत  सर्वांच्या  घोळक्यात
आंदोलन करीत होते ,शेतकऱ्यांना पाठिंबा देत होते,त्यांचा"वीज -पुरवठा" तोडण्यासाठी ,
जीवाचे  भय  न  ठेवता ,अतिशय  धाडसाने ,धीराने  घोषणा  देत  होते  धडाक्यात .

(2)
"मयूर  बोर्डे"  आहेत  तालुकाध्यक्ष ,स्वाभिमानी  संघटनेचे  एक स्वाभिमानी  पदाधिकारी
लोकांचे  प्रश्न  सोडविण्या ,त्यांचे  हीत  होण्या ,त्यांनी  उचललीय  प्राथमिक  जबाबदारी
स्वतःहून  उतरतात  ते  लढ्यात , कुणाचीही  वाट  न  पहाता ,धैर्याने  सामोरे  जातात ,
शेकडो  कार्यकर्ते त्यांच्या हाताखाली,पण आपणहून संग्रामात  ते  नेहमीच  उडी  घेतात .

(3)
आधीच  हतबल ,दिन ,गरीब  झालेला  शेतकरी ,त्यात  त्याचा  "वीज -पुरवठा"  तुटलाय
गांजलेल्या,पीडित,लाचार,दयनीय शेतकऱ्यांचा सरकारला कळवळा कसा नाही आलाय  ?
पीक  नाही ,शिवार  वाहून जाई ,उघड्या  डोळ्यांनी  बळीराजा  हे  सर्व  पहात  राही ,
अन्नदाता  असुनी  खायला  अन्न  नाही ,पैसे  नाही ,तो  विजेचे  बील  कोठून  देई  ?

(4)
सरकारला  नाहीय  चाड , डोळ्यांवर  आलीत  झापडे ,शेतकऱ्यांचे  हाल  दिसत  नाहीत
कठोर  नियमावली  काढून  वीज  खाते ,या  गरिबांचा  "वीज -पुरवठा"  करतेय  खंडीत
"मयूर"  यांना  सरकारचा  गलथान  कारभार  नाहीय  पसंत ,वागणे  नाहीय  रुचत ,
शेतकऱ्यांचा आवाज उठविण्या,त्यांनी स्वीकारलाय हा अनोखा आंदोलन  मार्ग  अखंडित .

(5)
स्वाभिमानी  बाणा  या  "मयूरांचा" ,त्यांना  जुलूम ,अत्याचार  नाही  सहन  होत
विद्रोही  मन  बंड  करून  उठलंय ,नसानसातून  वाहतोय  त्यांच्या  रक्त -ज्वाला -स्रोत
जोवर  शेतकऱ्यांना  मिळत  नाही  न्याय , तोवर  मी  याच  अवस्थेत  राहीन ,
पुढे म्हणती,बस  झाली सरकारची मुजोरी आता,शेतकऱ्यांचे घर पुन्हा उजळलेले पाहीन .

(6)
गोलाकार  रिंगणात  लोकांच्या ",मयूर  बोर्डेनी"  स्वतःस  गळ्यापर्यंत  गाडून  घेतले  होते
अचंबित  जन  आश्चर्य  व्यक्त  करीत ,त्यांचे  हे  अजब  आंदोलन  पहात  होते
घोषणा देत होते,नाराजी व्यक्त करीत होते,सरकारची नामुष्की,खेद व्यक्त  करीत  होते ,
पहाता-पहाता त्यांना पाठिंबा देण्या ,त्यांच्या  भोवतालचे  रिंगण , अधिकच  फुलत  होते .

(7)
"मयूर"-सर असे  कोठवर  चालणार  ? ताळ्यावर  हे  सरकार  कधीच  नाही  येणार  !
कशाला  जीवाची  बाजी  लावताय  ? आपल्या  जीवावरच  ओढवून  घेताय  ?
सरकारच्या  डोळ्यांवर  आहेत  झापडे ,कानांना  बसलेत  दडे , बंड  झालीत  तोंडे ,
तुमच्यासारखेच आहेत शेकडो आंदोलनकारी,दखल घेताहेत का,सरकारचे अडलेय का  घोडे ?


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2021-शनिवार.