II हैप्पी क्रिसमस-मेरी क्रिसमस II-कविता क्रमांक-15

Started by Atul Kaviraje, December 25, 2021, 03:48:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                  II हैप्पी क्रिसमस-मेरी क्रिसमस II
                                          कविता क्रमांक-15
                                ---------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२५.१२.२०२१-शनिवार आहे. प्रभू येशू यांचा जन्म दिवस. हा शुभ दिन,सण  नाताळ, किंवा ख्रिसमस या नावानेही साजरा केला जातो. मराठी कवितेतील माझ्या सर्व ख्रिस्ती बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस नाताळाच्या  माझ्या  हार्दिक शुभेच्छा. "मेरी ख्रिसमस - शुभ नाताळ", "हैप्पी क्रिसमस-मेरी क्रिसमस". ऐकुया , नाताळाच्या काही कविता आणी गाणी.

                      नाताळ कविता क्रमांक-15---


आहे कुणाला खात्री उद्याची
उद्या काय होइल कळणार नाही
संधि अशी रोज येणार नाही
येणार नाही
आहे कुणाला खIत्री उदयIची

१)
जरी लाड केले या देहास जपले
पापामध्ये सांग रे कोण तरले
समजुं घे आज इच्छा प्रभुची
कोणी तुझ्या कामI येणार नाही
येणार नाही
आहे कुणाला खIत्री उदयाची

2)
तुला रे कुणाचा आधार नाही
पापी जिवाचा या उद्धार नाही
करशील जरी आज नकार प्रभुचा
उद्या तो तुला जवळ घेणार नाही
घेणार नाही
आहे कुणाला खात्री उदयाची

3)
पसरुनी हात उभा टांगला तो
माझ्याकडे या प्रेमाने म्हणतो
आहे उगाची मैत्रे जगाची
जग हे तुला शांती देणार नाही
देणार नाही
आहे कुणाला खात्री उदयIची


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-येशुकीमहिमा.इन)
                   -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-25.12.2021-शनिवार.