"२६-डिसेंबर – दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, December 26, 2021, 06:39:27 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-२६.१२.२०२१-रविवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                     "२६-डिसेंबर – दिनविशेष"
                                    -------------------------


अ) २६ डिसेंबर रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१८९५: लुईस आणि ऑगस्ट लुइम यांनी तिकीट विक्री करून पहिल्या चित्रपटाचा पहिला शो पॅरिस येथे प्रदर्शित केला.

१८९८: मेरी क्यूरी आणि पिअर क्यूरी यांनी प्रथमच रेडिअम हे मूलद्रव्य वेगळे केले.

१९७५: मॅक २ पेक्षा जोरात उडणारे जगातील पहिले व्यावसायिक सुपरसॉनिक टु – १४४ विमानसेवा सुरू झाली.

१९७६: कम्यूनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) ची स्थापना.

१९८२: टाइम (TIME) मासिकातर्फे दिला जाणारा मॅन ऑफ द इयर पुरस्कार प्रथमच पर्सनल कॉम्प्युटर (PC) या एका अमानवी वस्तूस देण्यात आला.

१९९१: सोव्हिएत युनियन औपचारिकरित्या बरखास्त करण्यात आले.

१९९७: विंदा करंदीकर यांना महाराष्ट्र फांऊंडेशन पुरस्कार.

२००४: ९.३ रिश्टर तीव्रतेच्या एका भूकंपाने एक प्रचंड त्सूनामी लाट निर्माण होऊन भारत, श्रीलंका, इंडोनेशिया, थायलँड, मलेशिया, मालदीव आणि इतर अनेक देशात  सुमारे २,३०,००० लोक मृत्युमुखी पडले.

=========================================

ब) २६ डिसेंबर रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१७८५: बेल्जियमचे पहिले पंतप्रधान एटिनी कॉन्स्टन्टाईन डी गर्लचा यांचा जन्म. (मृत्यू: १० फेब्रुवारी १८७१)

१७९१: इंग्लिश गणितज्ञ, संशोधक, अभियंता आणि तत्त्वज्ञ चार्ल्स बॅबेज यांचा जन्म. (मृत्यू: १८ ऑक्टोबर १८७१)

१८९३: आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर १९७६)

१९१४: कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी २००८)

१९१४: स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री डॉ. सुशीला नायर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी २०००)

१९१७: साहित्यिक डॉ. प्रभाकर माचवे यांचा जन्म.

१९२५: शास्त्रीय गायक, संगीतकार व शिक्षक पं. कृष्णा गुंडोपंत तथा के. जी. गिंडे यांचा जन्म. (मृत्यू: १३ जुलै १९९४)

१९३५: रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुउद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका डॉ. मेबल आरोळे यांचा जन्म. (मृत्यू: २७ डिसेंबर १९९९)

१९४१: रंगभूमीवरील कलाकार लालन सारंग यांचा जन्म.

१९४८: डॉ. प्रकाश आमटे यांचा जन्म.

=========================================

क) २६ डिसेंबर रोजी झालेले मृत्यू.
   ---------------------------

१५३०: पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक बाबर यांचे निधन. (जन्म: १४ फेब्रुवारी १४८३)

१९७२: अमेरिकेचे ३३ वे राष्ट्राध्यक्ष हॅरी एस. ट्रूमन यांचे निधन. (जन्म: ८ मे १८८४)

१९८९: व्यंगचित्रकार व लेखक केशवा तथा के. शंकर पिल्ले यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९०२ – कायमकुलम, केरळ)

१९९९: भारताचे ९ वे राष्ट्रपती व ८ वे उपराष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९१८)

२०००: नाटककार आणि साहित्यिक प्रा. शंकर गोविंद साठे यांचे निधन.

२००६: अभिनेते कृष्णचंद्र मोरेश्वर तथा दाजी भाटवडेकर यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९२१)

२०११: कर्नाटकचे १५ वे मुख्यमंत्री सरेकोपा बंगारप्पा यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९३३)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.12.2021-रविवार.