चारोळ्या-"वाट पाहून कंटाळले ते विलीनीकरणाची,आता आस उरलीय फक्त स्वेच्छा-मरणाची"

Started by Atul Kaviraje, December 29, 2021, 01:38:25 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय :बीड  येथे  ST आगारात , एकूण  २००  ST कर्मचाऱ्यांनी , स्वेच्छा -मरणासाठी , मुख्य -मंत्र्यांकडे  स्वतःच्या  सह्या  करून  मागणी -पत्र  दिले.
                      ST कर्मचारी  स्वेच्छा -मरण -चारोळ्या
  "वाट पाहून कंटाळले ते विलीनीकरणाची,आता आस उरलीय फक्त स्वेच्छा-मरणाची"
--------------------------------------------------------------------------


(1)
आम्हा "मरण"हवे ,आम्हा"मरण" द्या,आम्हाला "दया -मरण"हवे ,आम्हाला  "मृत्यू" द्या
रांगेत  उभे  होते बीड  ST आगारात  २००  कर्मचारी , "स्वेच्छा -मरणाचा" अर्ज  घेऊन
अंतिम  निर्णय  होता  त्यांचा , सर्वस्व  जणू  गमावले  होते ,सर्व  काही  हरून ,
अढळ  निर्णयच जणू , चेहऱ्यावरील  दृढ -निश्चय  त्यांच्या  येत  होता  दिसून .

(2)
२  महिने  होते  उलटून  गेले , ST कर्मचाऱ्यांच्या  संपIला ,आंदोलनाला
आपल्या  मागण्यांवर  होते  अटळ  , घरा -दाराला  सोडून ,त्यजून  कुटुंबाला
आमिषे दाखवीत कितीतरी, सरकारने उडवली  होती त्यांची  टर,केली होती फसवणूक ,
अन  स्वतः  होते  हसत ,त्यांची  विवशता  पाहून ,होत  होती  सरकारची  करमणूक .

(3)
रोज  एक  "मरण" , ST कर्मचारी  रोजच  "मरत"  होते ,"मरणातच"  ते  जगत  होते
दुसऱ्या दिवसाच्या "मरणाची"  तयारी,ते आजच  करत  होते,उद्याचे "मरण" त्यांना  दिसत  होते
सरकार काही दाद  देत नाहीय ,ताकास तूर लागू  देत  नाहीय ,हे  त्यांना  कळत  होते ,
अंती  एका  कठोर  निर्णयावर  येऊन ,ते  ठाम  अडले  होते ,निश्चयच  करत  होते .

(4)
बीड  येथील  ST कर्मचारी ,"स्वेच्छा -मरण"  आवेदनावर  सह्या  करीत  होते
सर्व  खंत ,दुःख ,वेदना ,अपमान ,विवशता ,निराशा  यांच्याही  ते  पलीकडे  गेले  होते
कुटुंबास  पाठी  कुणी  पाहिलं  याची  त्यांना  मुळीच  चिंता  नव्हती ,खेदही  नव्हता ,
"स्वेच्छा -मरणाच्या"  आवेदनावर  सह्या  करताना , त्यांचा  हातही  थरथरत  नव्हता .

(5)
आत्महत्त्या  केलेल्या  बंधू -सहकाऱ्यांची ,त्यांना  तीव्रतेने  आठवण  येत  होती
त्यांनी दिलेल्या  बलिदानाची ,आत्म -समर्पणाची  भावना  त्यांना  बळ  देऊन  जात  होती
आता आपले भविष्य नाही,सारा अंधारच आहे,ही नियती आहे ,आणि  ती  अटळ  आहे ,
त्यांच्या  मनातील  सर्व -सर्व  भावना ,या "स्वेच्छा -मरण"  पत्रातून  स्पष्ट  दिसत  होती .

(6)
आता  जगून  तरी  काय  करायचे ,जीवनात  काहीही  नाही  उरलंय
हताशा ,संताप ,नैराश्य ,भीती  यांनी  ग्रासून  त्यांची  विवेक -बुद्धीच  हरवली  होती
आता  "मरणच"  यातून  करील  सुटका , "मरणालाच"  आता  कवटाळायचे ,
अन  "मृत्यूच्या"  कुशीत  डोळे  मिटून  शांतपणे , कायमचेच  झोपी  जायचे .

(7)
स्वतःशीच  खेदपूर्वक  हसत ,खिन्न, उदास  मनाने  ते  म्हणत  होते
आमच्या  "मृत्यूस"  कुणासही  धरू  नये  जबाबदार , असे  ते  या  पत्रात  लिहीत  होते
त्यांचे "इच्छा-मरण" पत्र  घेऊन , जासूद  मुख्य -मंत्री  मातोश्री  गडावर  निघाला  होता ,
ते सारे ST कर्मचारी मावळत्या सूर्याला अर्घ्य देऊन,उद्याच्या"मरणाची"वाट पहात होते .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.12.2021-बुधवार.