"कर्णेही आता पाळू लागलेत मौन,ध्वनी-प्रदूषणाविरुद्ध लागू केलाय PLEASE NO HORN"

Started by Atul Kaviraje, December 30, 2021, 02:07:17 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय : पुणे , खेड येथे , LIFE SAVING FOUNDATION संस्थेने , वाढत्या  ध्वनी  प्रदूषणाविरुद्ध ,  दिनांक -१२ .१२ .२०२१ , रोजी , नो - हॉर्न  दिवस  पाळला .
                   ध्वनी  प्रदूषणाविरुद्ध  नो - हॉर्न  दिन -चारोळ्या
"कर्णेही आता पाळू लागलेत मौन,ध्वनी-प्रदूषणाविरुद्ध लागू केलाय PLEASE NO-HORN"
--------------------------------------------------------------------------


(1)
लोकसंख्या  वाढतेय ,पुण्यातली  वर्दळ  वाढलीय ,चालणेही  कठीण  होई
त्यात  ही  वाहनांची  रेटारेटी ,रस्तोरस्ती  चक्क  त्यांची  खेटाखेटीच होई
मार्ग -क्रमण  करण्या , वाट  काढण्या , तीव्र  "हॉर्नने"  विविध  संकेत  दिले  जाई ,
कानठळ्या  फाडणारे ,पडदे  सुन्न  करणारे ,हे  कर्णकटू  संगीत  मग  सुरु  होई .

(2)
गर्दी  काही  हटत  नाही ,वाहने  काही  सुटत  नाहीत ,TRAFFIC JAM-च  होतंय
सकाळी  निघालेला  माणूस  संध्याकाळीच  कचेरीत  वर्णी  लावतोय , हजेरी  देतोय ,
आधीच  वायू -प्रदूषण , त्यात  हे "ध्वनी -प्रदूषण" ,माणूस  नुसता  मेटाकुटीस  आलाय ,
शांती  हरवलीय , हृदयाच्या  ठोक्याने  गती  घेतलीय ,संयमाचा  सारा  बांधच  सुटलाय .

(3)
आधीच  इतर  "प्रदूषणे" होती  कमी , म्हणून  की  काय  माणसानेच  हे  वरदान  दिलेय
पुढे  जाण्याच्या  अहमहमिकेत , एकमेकांच्या  चुरशीत  तो  वाहनातून  फिरू  लागलाय
वर  या  कर्णकटू  "हॉर्नचा"  शोध  लागून ,तो  रस्ता  पादाक्रांत  करू  लागलाय ,
तो  आधी  की  मी  आधी ,या  पुढे  जाण्याच्या  इर्षेने  तो  निसर्गाचा  समतोल  बिघडवू  लागलाय .

(4)
आज  मनुष्याला  खरी  आहे  गरज ,शांती , मनःशांतीची ,या  धावत्या  जगतात
पण  या  "HORN"-ने  उडवलीय  त्याची  झोपच , रात्रंदिवस  कधीही  ते  वाजतात
जनता कंटाळलीय ,त्रस्त झालीय,कासावीस  झालीय,पण  तक्रार  कुणाकडे  करायची  ?
झोपेतही त्याला पडताहेत,आवाजाचीच स्वप्ने ,भीती वाटू लागलीय त्याला  "HORN"-ची .

(5)
पुणे -खेड  येथे ,संस्था  धावलीय  घेण्या  जनतेचा  पक्ष ,घेण्या  कैवार
१२.१२.२०२१,रोजी घोषित केलाय त्यांनी "NO-HORN" दिन,थांबवून गाड्यांचा  व्यवहार
LIFE SAVING FOUNDATION संस्था,अशी अनेक करते ,समाजोपयोगी कामे , जनतेच्या  हिताची ,
वाढत्या "ध्वनी-प्रदूषणाविरुद्ध"ते राबवतात मोहीम नेहमीच,अंमलबजावणी करून या कायद्याची .

(6)
असे "ध्वनी -प्रदूषण" दिन नेहमीच  पाळण्यात  यावेत ,हे  लोण  साऱ्या  देशभर  पसरावे
चैन ,अमन ,सुकून ,शांतीचे  पुन्हा  एकवार  साऱ्यांना  खरेखुरे  अनुभव  यावे
अशा  संस्था  सारीकडे  कार्यरत  व्हाव्यात ,"प्रदूषणाविरुद्ध" नेहमीच  उभ्या  राहाव्यात ,
एरव्ही  गजबजलेले ,दाटीवाटीचे  रस्ते , वाटा  केव्हातरी  एकदा  शांततेत  नहाव्यात .

(7)
असे  चित्र  केव्हा  दिसेल , रस्त्यावर  गाडीही  चक्क  धरतेय  मौन  ?
खाणाखुणा  करीत  एकमेकांना,  पुढे  जातेय  शांतपणे , न  वाजवता  "हॉर्न"  !
या  संस्थांचा  उद्देश्य  मग  होईल  पूर्ण , त्यांच्या  कामाचे  होईल  चीज ,
हा  कर्णकटू  ध्वनी  कायमचाच  विरून ,जनतेला  येईल  मग  सुखाची  नीज .


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.12.2021-गुरुवार.