का आंधळा तरी तू.........

Started by SHASHIKANT SHANDILE, December 30, 2021, 11:11:17 AM

Previous topic - Next topic

SHASHIKANT SHANDILE

या सागरी कितीसा पाणी भरून आहे
पण वाटण्यास पाणी तोही अडून आहे

पाहून माणसांची बेकार लालसा ही
त्या सागरात पाणी खारे बनून आहे

मोजून दाम घेतो माणूस आज पाणी
काही हिशोब आता बाकी अजून आहे

विध्वंस जंगलांचा सोचून काय केला
अंगार उष्णतेची पुन्हा दबून आहे

थोडे करून काही फेडून पाप घेऊ
कारण निसर्ग आता कंबर कसून आहे

काही जबाबदाऱ्या आहेत माणसांच्या
पण धूळ मीपणाची भारी चढून आहे

बघ तापतो 'शशी'ही दरसाल केवढा हा
का आंधळा तरी तू सारे बघून आहे
********
शशिकांत शांडिले (एकांत), नागपूर
भ्र.९९७५९९५४५०
Its Just My Word's

शब्द माझे!