चारोळ्या"फोर्ब्स यादीत नाव झळकलंय,मातीलदारुपी लखलखते रत्न भारत-कोंदणात प्रकाशलय"

Started by Atul Kaviraje, December 31, 2021, 02:15:22 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : ओडिशा  येथील  आशा -सेविका , श्रीमती  मातीलदा कुल्लू  या  गेली  कित्येक  वर्षे , जनसेवा ,जन -जागृती , अंधश्रद्धा  निर्मूलन , गरिबांची  सेवा , कोविड  काळात  रुग्णांची  सेवा , अशी  अनेक  समाजोपयोगी  कार्ये  करीत आहेत . सुंदरगड  येथे  राहणाऱ्या  श्रीमती  मातीलदा  कुल्लू  आता  ४५  वयाच्या  आहेत . साऱ्या  गावभर  आणि  पंचक्रोशीत  त्यांची  आरोग्य -सेविका  म्ह्णूनही  ख्याती  आहे . त्यांच्या  या  महान  कार्याची  दखल  घेऊन  'फोर्ब्स'  या  जागतिक , नामांकित  संस्थेने , यंदा  म्हणजे  साल -२०२१  मध्ये  आपल्या  जागतिक  शांतीपूर्ण  कार्य , आणि  सेवाभावी  कार्य  या  मॅगेझिनमध्ये    जागतिक  कर्तृत्त्ववान  स्त्रियांच्या  यादीत  त्यांना  स्थान  देऊन  गौरवान्वित  केले  आहे .
            आशा -सेविका -श्रीमती  मातीलदा कुल्लू -प्रेरणादायी  चारोळ्या
"फोर्ब्स-च्या शांतीपूर्ण यादीत नाव झळकलंय,मातीलदारुपी लखलखते रत्न भारत-कोंदणात प्रकाशलय"
--------------------------------------------------------------------------


(1)
गावागावांत  "आशा -सेविका"  आहेत  कार्यरत ,जनसेवेला  त्यांनी  आयुष्य  वहिलंय
गरिबांच्या ,ग्रामस्थांच्या  सेवेस  त्या  आहेत  तत्पर ,त्यांनी  स्वतःला  झोकूनच  दिलंय
रात्र  नाही ,दिवस  नाही ,अडी -अडचणींस त्या  धावून  जातात ,बहुमूल्य  सेवा  देतात ,
फळाची अपेक्षा न धरता,त्या सदैव समाजोपयोगी काम  आणि  कामच  करीत  रहातात .

(2)
"मातीलदा कुल्लू"  अशीच  एक  "आशा -सेविका" ,वास्तव्य  तिचे  ओडिशा -मधले
तिला  आहे  आवड  जनसेवेची ,तिचे  स्थान  आहे  अढळ ,पक्के  या  नोकरी -मधले
कार्यच  तिचे  आहे  असे ,पंचक्रोशीत  तिचे  नाव  गाजतंय ,तिची  वाहवा  होतेय ,
"मातीलदा"सर्वस्वाचे करून बलिदान,फक्त जनहितच पाहतेय,त्यांच्यासाठीच ती जगतेय .

(3)
जन -जागृती ,अंधश्रद्धा  निर्मूलन  कार्य ,कोविड -काळी  रुग्णांची  सेवा
अशी  अनेक  कार्ये  करीत  आलीय  ही  आजची  "Florence Nightingale"
आरोग्य -सेविका  म्हणून  ख्याती  तिची ,गाव सुंदरगड आहे  तिचा ऋणी,आहे  आभारी ,
हात  लावताच ,होतोय  रुग्ण  व्याधीमुक्त ,होतोय  स्वस्थ ,होतोय  (बरा) वेल .

(4)
आज वय त्यांचे  आहे ४५ वर्षे,वाहून घेतले होते  लहानपणीच सेवेस , समजूत  येता -येता
कळवळा  येत  होता ,तिला  ही   समाजाची  दयनीय  परिस्थिती ,गरिबी  पहाता -पहाता
निश्चयच  केला  होता  तेव्हापासून  आजपर्यंत  तिने , पाठी  वळून  नाही  पाहिलंय ,
आपल्या  या  सेवाभावी  वृत्तीने ,दया -मायेच्या  या  देवीने ,सर्वांना  आपलेसे  केलंय .

(5)
दखल  घेतलीय  तिच्या  कार्याची ,"फोर्ब्स"  या  जागतिक ,नामांकित  संस्थेने
शांतीपूर्ण,सेवाभावी महिलांच्या यादीत,नाव झळकतंय"मातीलदाचे",स्थान मिळालंय ,उच्च  क्रमांकाने
जगात नाव झालंय भारताचे,मान उंचावलीय तिने भारताची,आपल्या दैदिप्यमान पराक्रमाने
एक  स्त्रीही  पुढे  येऊ  शकते ,हे तिनं दाखवून दिलंय,आपल्या या  प्रामाणिक  कार्याने .

(6)
वयाने असली धाकली तरी,या अतुल-बंधू कविराजाचा, तिला  सहृदय ,सविनय  नमस्कार
जे जमले नाही एका पुरुषाला,दाखवतेय ही "आशा -सेविका" , तिचा  असो  जयजयकार
आज ती अश्या अनेक"आशा-सेविकांची"बनलीय प्रेरणा,दाखवतेय त्यांना जनसेवेचा मार्ग ,
खितपत पडलेल्या गोर-गरिबांना,रुग्णांना,मदत करून तिने त्यांच्या चरणांशी वाहीलाय  स्वर्ग .

(7)
अनेक "आशा-सेविका" आहेत  देशात ,अहोरात्र  त्यांनी  स्वतःस  सेवेत  झोकून  दिलंय
तहान -भुकेची  पर्वा  न  करता ,जनसेवेस  तिन्ही -त्रिकाळ  त्यांनी  वाहूनच  घेतलंय
या  देवींचा  यथा -योग्य  सत्कार  व्हावा ,त्यांना  समाजात  मान  मिळावा , नाव  व्हावे ,
त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून,जनसेवेचा वसा घेण्या,सर्वांनीच पुढे यावे ,अग्रेसर  व्हावे .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.12.2021-शुक्रवार.