चारोळ्या-"जुने वर्ष सरले,नवे वर्ष आले,कोरोनाने आमचे सारे दिवस हिरावून घेतले"

Started by Atul Kaviraje, December 31, 2021, 11:08:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     विषय : कोरोना  काळात  मुंबईत  लग्न -सराई  व  पार्ट्यांवर  मुंबई  महानगर   पालिकेची  नजर .
                              वास्तव -कोरोना  चारोळ्या
      "जुने वर्ष सरले,नवे वर्ष आले,कोरोनाने आमचे सारे दिवस हिरावून घेतले"
--------------------------------------------------------------------------


(1)
दिवस  येताहेत ,दिवस  जाताहेत , "वर्षे"  येताहेत ,"वर्षे"  सरताहेत
सूर्य  उगवतोय , सूर्य  मावळतोय , रात्र  येतेय , रात्र  सरतेय
कशी  उडून  गेली  दोन  "वर्षे"  भुरकन , आम्हा  नाही  कळले ,
माणसाचे  माणसाशी  बोलणे  तुटले , संबंध  दुरावले .

(2)
या  "कोरोनाने"  माणसाचे  सारे  हक्क ,स्वातंत्र्य  हिरावून  घेतले
बंद  दारा -आड ,चार  भिंतींत ,त्याला  डांबून  कोंडून  ठेवले
गुलाम -गिरीचेच  जीवन  जगतोय , असे  आता  वाटू  लागलंय ,
"कोरोनाचे"  सावट  जगIवरले , अधिकच  गडद  होताना  पाहिलंय .

(3)
पार्टी  नाही ,लग्न -सराई  नाही ,कार्यक्रम  नाही ,देव -दर्शन  नाही
बोलणे  नाही ,चालणे  नाही ,फिरणे  नाही ,मुक्त  बागडणे  नाही
गर्दीत  मिसळायची  सोय  नाही ,एकत्र  येण्याची  मुभा  नाही ,
माणसापासून  माणूस  नकळतच , दुरावत  जाई , लांब  जाई .

(4)
पारतंत्र्याचे  हे  कृष्ण -सावट , कधीपर्यंत  राहील  मानवास  ग्रासून  ?
काहीच  नाही  मार्ग ,काहीच  नाही  उपाय ,स्वतःलाच  पहातोय  विचारून  !
अशी  काय  घडली  होती  चूक , असा  काय  घडला  होता  उपमर्द  ?
विकराल  "कोरोनाचा"  वेढा  झालाय , अIणिकच  घट्ट  आणि  गर्द  !

(5)
लोकांकडे लक्ष देता-देता,महानगर पालिका स्वतःच सापडलीय "कोरोनाच्या"  विळख्यात
अफाट  जनसंख्येच्या ,लोकसंख्येच्या  या  विशाल  मुंबई  महानगरात
जिकडे  पाहावे  तिकडे  "कोरोनाचे"  थैमान , नंगानाच  सुरु  आहे  अथक ,
कोठवर  रोखील  त्याला , कसा  घालील  आळा , हे  नगर -पालिकेचे  सुरक्षा  पथक  ?

(6)
आता  नागरिकांनीच  सजग  व्हायची ,सतर्क  व्हायची   आलीय  पाळी
त्रिसूत्री  नियमांचे  कटाक्षाने  व्हावे  पालन , दक्षता  घेऊन  सगळी
नवीन  "वर्षाचे"  स्वागत  आपण  सारे  घरी  राहूनच  करूया ,
घराच्या  खिडकीतूनच , नवं -"वर्षाच्या"  नवं -सूर्याचा  उदय  पाहूया .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.12.2021-शुक्रवार.