नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - 2022-शुभेच्छा क्रमांक-10

Started by Atul Kaviraje, January 01, 2022, 12:23:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                             नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - 2022
                                       शुभेच्छा क्रमांक-10
                            ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-३१.१२.२०२१-शुक्रवार, गतवर्षाला निरोप देऊया, आणि दिनांक-०१.०१.२०२२-दिनांक-शनिवार, नवं-वर्षाचे मनापासून स्वागत करूया. या नवं-वर्षी(२०२२), नव्या कामांची,कार्यांची यादी करूया आणि ती वर्ष-अखेर पूर्वी पूर्ण करण्याचाही मनापासून संकल्प करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी,कवी-कवयित्री ना या नवं-वर्षाच्या (वर्ष-२०२२) च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या नवं-वर्षाचा महत्त्वाचा लेख, शुभेच्छा, सदिच्छा इत्यादी. 

अशीच आशा करतो की,
तुम्ही द्याल योग्य लोकांची साथ,
राहाल चांगल्या लोकांच्या सान्निध्यात,
येणारा काळ चांगला जावो आणि नववर्ष सुंदर जावो.

नववर्ष म्हणजे जणू कोरी वही आहे,
पेन म्हणजे तुमचा हात आहे.
आता तुमच्याकडे नव्या वर्षाची
सुंदर कहाणी लिहीण्याची संधी आहे.
--नवं वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.

नववर्ष तुमच्यावर करो नव्या संधीची बरसात,
प्रत्येक पावलावर तुम्हाला मिळो
यश आणि आनंद साजरा करण्याचं कारण,
--हॅपी न्यू ईयर.

Naveen varsh aapnans sukh samadhanache,
Aanandache, aishwarya, aarogyache javo.
Naveen varshat aaple jeevan aanadmaye,
Sukhmaye hove, aashi shricharni prarthana.
Happy New Year.

नववर्ष तुमच्या जीवनातील दुखाःचा नाश करू दे
आणि नव्या सुखांना तुमच्या आयुष्यात आणू दे.

जर आपण पुढच्या दशकाकडे पाहिलं तर कळेल की,
तेच नेतृत्व करतील जे दुसऱ्यांनाही सशक्त बनवतील.
--नववर्षाभिनंदन.

जगभरात नववर्षाचा जल्लोष साजरा केला जातो.
मग तुम्हीही सामील व्हा या आनंदात.
--हॅपी न्यू ईयर.

आशा आहे तुम्हाला नव्यावर्षात प्रत्येक दिवशी यश मिळो,
प्रत्येक दिवस आनंदी असो.
--हॅपी न्यू ईयर.

मला आशा आहे की नवीन वर्ष आपल्या
आयुष्यातील सर्वोत्तम वर्ष असेल.
आपली सर्व स्वप्ने सत्यात येतील आणि
आपल्या सर्व आशा पूर्ण होतील!

कोणतीही गोष्ट आपली मैत्री कमकुवत करू शकत नाही.
जितकी वर्षे आपण एकत्र घालवली तितकीच आपली मैत्री
आणखी मजबूत झाली.
--नवीन वर्षाच्या शुभेच्छा 2022!


                        (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                       -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2022-शनिवार.