नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - 2022-शुभेच्छा क्रमांक-12

Started by Atul Kaviraje, January 01, 2022, 12:26:45 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                           नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा - 2022
                                       शुभेच्छा क्रमांक-12
                         ------------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     दिनांक-३१.१२.२०२१-शुक्रवार, गतवर्षाला निरोप देऊया, आणि दिनांक-०१.०१.२०२२-दिनांक-शनिवार, नवं-वर्षाचे मनापासून स्वागत करूया. या नवं-वर्षी(२०२२), नव्या कामांची,कार्यांची यादी करूया आणि ती वर्ष-अखेर पूर्वी पूर्ण करण्याचाही मनापासून संकल्प करूया. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी,कवी-कवयित्री ना या नवं-वर्षाच्या (वर्ष-२०२२) च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया, या नवं-वर्षाचा महत्त्वाचा लेख, शुभेच्छा, सदिच्छा इत्यादी. 

आपण एकमेकांपासून लांब असलो
तरी मनातून जवळ आहोत,
म्हणूनच न सांगताही
एकमेकांचं दुःख समजून घेतो..
नव्या वर्षातही असंच राहूया..
--नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा..!

उधाण येवो सत्कार्याला
फूटो यशाची पालवी,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
--नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सुख दुःख सहन करत
मात दिली त्या गत वर्षा,
मनामनातील भावनांनी
स्वागत करू या नववर्षा..
नवीन वर्षाच्या आपणास व आपल्या
परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे...
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे....
आपणांस व आपल्या परीवारास
--नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसा.कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2022-शनिवार.