एक चन्द्र एक चांदनी

Started by marathi, February 15, 2009, 08:02:29 PM

Previous topic - Next topic

marathi

एक चन्द्र एक चांदनी
दोघांची ही अजब कहाणी
चान्दनिला ओढ़ चंद्राची
अन चंद्राला कालजी साऱ्या जगाची
चंद्राला पाहण्या रोज रात्री
चांदनी न चुकता नभी येई
अन चन्द्र मात्र तिला विसरून
साऱ्या जगाला प्रकाश देई

विचारले असता चांदनिने त्याला
तो अवचित उत्तरला तिला
" जगाला साऱ्या प्रकाश देण्या
देवाने दिला जन्म मला,
रुण त्याचे फेडाय्चे मला
कशी देऊ साथ तुला"
उत्तर ऐकून चंद्राचे चांदनी निशब्द राही
तरीही चन्द्रावरचे तिचे प्रेम कधीही कमी न होई
असा तो चन्द्र अन् ती चांदनी
दोघांची ही अजब कहाणी .........

खरे सांग देवा असे नेहमी का व्हावे
मनात नसताना चन्द्र चांदणी पासून का दुरावे
कधी न राहो अधूरी त्यांची कहाणी
असा एक चन्द्र अन् एक चांदनी ..........
-अश्विनी