"प्रदूषणाच्या विळख्यात सापडतोय महाराष्ट्र,धुक्यात विरघळून जातोय महाराष्ट्र"

Started by Atul Kaviraje, January 01, 2022, 02:00:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : सध्या  वातावरणातले  प्रदूषण  इतके  वाढत  आहे , की  मनुष्याला  मोकळा  श्वास  घेणेही  दुरापास्त  होतेय . या  प्रदूषणाचा  विळखा  महाराष्ट्रास  बसून , तो  हळू -हळू  दिल्ली  येथे  पसरून , पर्यायाने  तो  शेवटी  साऱ्या  देशास  व  जगासही ग्रासेल  , यात  तीळ -मात्रही  शंका  नाही . या  प्रदूषणास  फक्त  एक  आणि  एक  मानवच  सर्वस्वी  जबाबदार  आहे .
                  वास्तव -वाढते  प्रदूषण -एक  गंभीर  समस्या -चारोळ्या
      "प्रदूषणाच्या विळख्यात सापडतोय महाराष्ट्र,धुक्यात विरघळून जातोय महाराष्ट्र"
--------------------------------------------------------------------------


(1)
कारखान्यांतील  धूर , वाहनांचे  उत्सर्जन ,आणि  याची  कारणे  खूप  काही
सकाळी  चालताना  समोरचा  माणूस  दिसत  नाही ,धुक्यात  विरून जाई
या  सर्वाला  आपणच  आहोत  जबाबदार ,देऊन  चालणार  नाही  कुणा  दूषण ,
दिवसेंदिवस  वाढतेय  महागाईसारखे ,ग्रासून  टाकतेय  धरती -आकाश , हे  घातकी  "प्रदूषण" .

(2)
आपणच  केलेल्या  कामाचे  हे  फळच  आपणास  मिळतेय , सजा  होतेय
वृक्षतोड -जंगलतोड ,यास्तव  उद्ध्वस्त  झालेली  वनराई , यास  कारणीभूत  होतेय
वाढते  उद्योग -धंदे ,वाहनांची  वर्दळ ,कार्बन  वायूचे  पावलो -पावली होणारे  उत्सर्जन ,
वातावरणातील  हा  जीवास  अपायकारक  वायू , टिकून  राहतोय  न  होता  विसर्जन .

(3)
एक  दिवस  असा  येईल ,पृथ्वी  नामक  ग्रह  धुक्यातच  विरघळून  जाईल
शनी -कड्यांस्तव  पृथ्वीच्या  वातावरणात  कार्बन  वायूचे  गोलाकार  कडे  तयार  होईल
कधीकाळी आकाशगंगेतला हा एकुलता राहण्याजोगा ग्रह त्याचा संपूर्ण  विनाशच  होईल ,
आणि  त्यापाठी  फक्त  हा  माणूसच ,सर्वतोपरी ,सर्वथा  जबाबदार  राहील .

(4)
मानव  नावाचा  बुद्धिमान  प्राणी  रहात  होता  या  सजीव  ग्रहावर
आपल्या  अफाट  सामर्थ्याने  तो  जाऊन  पोचला  होता  चंद्रावर
बस  इथवरच  त्याची  प्रगती ,त्याचे  अधिक  उड्डाण  कमी  पडले  होते ,
आपल्याच हाताने ओढवलेल्या संकटाने,त्याची प्रगती खुंटली  होती ,पाऊल अडले  होते .

(5)
संशोधन  होतंय ,शोध  लागताहेत ,प्रगती  होतेय ,मानवाची  तरक्की  होतेय
पण  हेही  नाही  चालणार  विसरून ,त्याची  धाव  फक्त  कुंपणापर्यंतच  असतेय
कधी -काळी  निर्धुक  असणारा  महाराष्ट्र , आज  धुराच्या ,धुक्याच्या  विळख्यात  सापडलाय ,
या  "प्रदूषणाने"  हळू -हळू  हात -पाय  पसरून ,साऱ्या  जगासही  घेराव  घातलाय .

(6)
वाढत्या "प्रदूषणाची"कारणे , आता  माणसाने  स्वतःच  शोधावीत ,त्यावर  विचार  व्हावा
शेवटी  आपला  जीव  महत्त्वाचा ,या  जीवघेण्या  "प्रदूषणावर"  त्वरित  उपाय  करावा
कळत-नकळत इतक्या वेगाने वाढतंय हे"प्रदूषण",डोळे-झाक करून  चालणार  नाही ,
उशीर  झाला  असेल  तेव्हा ,जेव्हा  जीवावरच  बेतेल ,फार -फार  उशीर  होई .

(7)
हे  "प्रदूषण"  रोखणं ,हा  अनर्थ  टाळणं ,मनुष्याच्याच  हाती  आहे
त्याने  केलेल्या  निसर्गातील  ढवळा -ढवळीचे , त्याला  फळ  मिळत  आहे
सर्व  काही  नाही  मिळणार , कुठेतरी ,काहीतरी  मनुष्याने  पत्करावा  कमीपणा ,
निसर्गाचा  समतोल  राखण्या , दूरदृष्टी  ठेवावी , अन्यथा  राहतील  फक्त  त्याच्या  पाऊल -खुणा .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2022-शनिवार.