होय प्रिये.... होऊ दे धुंद आज मनाला...!

Started by Satish Choudhari, April 22, 2010, 04:20:15 PM

Previous topic - Next topic

Satish Choudhari

होय प्रिये..
होऊ दे धुंद आज मनाला
वेडं होतयं ते .. होऊ दे
नको अडवू त्याला ..
जातयं ते दुरदूर..
त्या आठवणींच्या गावी
बघु दे आज त्याला
त्या गावातली झाडफुलं
बघ ना पोहचलाय तो...

दिसली त्याला करकरणारी
भर उन्हाची दुपार
उनाड रस्ते , चुपचाप
जणु त्याचीच वाट त्यांना...
अधुनमधून पाखरांचा
तो चिव चिव चिवचिवाट
बघ ना पोहचलाय तो...
आज त्याच्या गावा

हळुहळू चाललायं रस्त्याने
नजर शोधत आहे कुणाला
आणि दिसलयं त्याला
माझं घर... ते जांभुळाचं झाड
अन् मग हळुच
उर तुझा दाटुन आला..
बरोबर आहे आठवलयं तुला
तुझ्या डोळ्यांसमोर सगळं
चित्रं उभं राहीलयं

दिसतयं आज तुला............
तुझ्या सायकलच्या मागे मागे
मी भर उन्हात धावतांना
अन् मग गावाबाहेर
त्या आंब्याच्या झाडाखाली
बसलो आहोत आपण
नाहिच आवरलं तुला
म्हणुन तु रागानं विचारलेलं
एवढ्या उन्हात काय गरज होती
कशाला मला बोलावलं

हळुच मग मी मुठ्ठी खोलुन
ती जांभुळं तुला दिली
अन् आता तुला पुन्हा
मनाला आवर घालता येईना..
मग गोंधळलेले डोळे तेव्हा
नकळत पाझरुन गेले
माहीत आहे...
खुप गहिवरून आलयं तुला
जसं आज पुन्हा झालयं तुला..

होय प्रिये..
होऊ दे धुंद आज मनाला
वेडं होतयं ते .. होऊ दे
नको अडवू त्याला ....

---- सतिश चौधरी