म्हणी-"गाड्याबरोबर नळ्याची यात्रा"

Started by Atul Kaviraje, January 01, 2022, 05:36:05 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

   'चारोळी व म्हणी" या विषया अंतर्गत आजची म्हण आहे - "गाड्याबरोबर नळ्याची यात्रा"

                                             म्हणी
                                          क्रमांक-96
                                 "गाड्याबरोबर नळ्याची यात्रा"
                                ---------------------------


96. गाड्याबरोबर नळ्याची यात्रा
    -------------------------

--मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होतच असतो.
--मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा होणे.
--वाक्य वापर : राजकारणात नेत्याला मोठे पद मिळाले की कार्यकर्त्यांचीही गाड्याबरोबर नळ्याची यात्रा होते.
--गाडी जेथें जाईल तेथें तिच्या चाकांना लावण्याचें ओंगण ठेवण्याचा नळा बरोबर असतोच. यावरुन मुख्य गोष्टीबरोबर आनुषंगिक गोष्टींनाहि त्या त्या स्थितींतून जावें लागतें
मुख्य मनुष्याबरोबर आश्रितांतहि मान मिळतो.
--मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार- गाडा जेथे जाईल तेथे चाकाला तेल, वंगण देण्याचा नळा बरोबर असणारच. त्‍याला सहजी यात्रा घडते. यावरून मोठ्याबरोबर लहानालाहि अनायासें फायदा मिळतो. दोन अगदी संबद्ध स्‍थिति एकसारखीच होते. ''अल्‍स्‍टर प्रांत इंग्‍लंडचा हस्‍तक आहे आणि बाकीचा आयर प्रांत हा जवळ जवळ स्‍वतंत्र आहे. अर्थातच 'गाड्याबरोबर नळ्याची यात्रा' ह्या म्‍हणीप्रमाणे इंग्‍लंडबरोबर अल्‍स्‍टर प्रांत जर्मनी विरूद्ध युद्धांत सामील झाला आहे.''-केसरी १६-७-४०.
--बैलगाडीच्या चाकांच्या आंसावर ल्युब्रिकेशन साठी वंगण( तेल)लागते. ते ठेवण्यासाठी एक बांबूची ( किंवा पत्र्याची) नळी व त्यांत ,तेल लावण्यासाठी चिंधी बांधलेली तार
( किंवा काडी)असते. गाड्याबरोबर त्या नळ्याची पण यात्रा होत असते.
तसेच एखाद्या महत्वाच्या व्यक्तीबरोबर साधारण माणसाला आवश्यक नसतांना यात्रा घडणे वा मान मिळणे, म्हणजे "गाड्या बरोबर नळ्याची यात्रा."


                      (साभार आणि सौजन्य-संदर्भ - महासराव .कॉम)
                     -------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2022-शनिवार.