"गीताबेननी शेवटी केलीय कोरोनावर मात,७ महिन्यांच्या त्या बिकट जीवघेण्या काळात"

Started by Atul Kaviraje, January 02, 2022, 01:47:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय : कोरोनाच्या  दुसऱ्या  लाटेत , गुजरामधील  दाहोद येथील  श्रीमती  गीताबेन  धार्मिक  याना   कोरोनाची  लागण  झाल्यावर  तब्बल  ९  वेळा  त्यांनी  मृत्यूशी  झुंज  देऊन , ७  महिने  इस्पितळात  राहून आपल्या  दुर्दम्य  इच्छाशक्तीने  कोरोनावर  अंती  मात  केली , व  स्वतःच्या  घरी  सुखरूप  पोहोचल्या .
                               वास्तव -कोरोना  चारोळ्या
"गीताबेननी शेवटी केलीय कोरोनावर मात,७ महिन्यांच्या त्या बिकट जीवघेण्या काळात"
--------------------------------------------------------------------------


(1)
"कोरोना"  काही  पाठ  सोडत नाहीय ,नामशेषच  होत  नाहीय
लशीकरण  झालेय , औषधोपचार  चाललेत ,तरीही  उपयोग  नाहीय
कर्दन -काळ  जणू  मानव -जातीचा ,अजिंक्य  शत्रू  येऊन  उभा  ठाकलाय   ,
मानव -जातीला  झुकवून , त्याला  शह  देऊन , तो  अधिकच  बळावलाय .

(2)
गुजरातेत  दाहोदमध्ये  "गीताबेनना"  "कोरोनाची"  झालीय  लागण
दुःखाने  ग्रासलंय  त्यांचे  घर , उदास  आहे  त्यांचे  अंगण
उपचारा  त्यांना  केलंय  इस्पितळात  भरती , लगोलग ,ताबडतोब ,
अत्यवस्थ  पाहून  अवस्था  त्यांची , गळून  गेलाय  जीवन -आशेचा  कोंब .

(3)
पण  ऐका  हो , "गीताबेनच्या"  दुर्दम्य  इच्छा -शक्तीची ही  कहाणी
९  वेळा,  गेल्या  ७  महिन्यांत  आली  होती , डॉक्टरांवर  इस्पितळात  आणीबाणी
त्याही  परिस्थितीत  "गीताबेन"  तरून  गेल्यात , त्यांना  जीवन -दान  मिळालंय ,
केव्हातरी  केलेलं  पुण्य ,सत्कर्म , देव -रूपाने  त्यांच्या  पाठीशी  उभे  राहिलंय .

(4)
एक  आश्चर्यच या  कलियुगातही  पाहावयास  मिळतंय
या  दुर्धर  कोरोना  रोगाने  ग्रासीत  शरीर , दुर्दम्य  इच्छा -शक्तीने  बरं  होतंय
पती  त्रिलोककुमारांनी  अंती  सुटकेचा  निश्वास  सोडलाय ,
गेल्या  ७  महिन्यांत  त्यांच्या  डोळ्याला  डोळा  नाही  लागलाय .

(5)
डॉक्टरांची  सारी  टीम  त्यांच्या  या  पुनर -जन्मास  कारणीभूत  आहे
"गीताबेनना"  त्यांनी  अक्षरशः , मृत्यूच्या  दाढेतून  खेचून  आणले  आहे
त्यांचे  आभार  मानावे  तेवढे  थोडेच ,देव -दूत  होऊनच  ते  रक्षणा  आलेत ,
"गीताबेनना"  जीवन -दान  दिल्याचे  आनंदाश्रू , त्यांच्या  डोळ्यांत  उभे  राहिलेत .

(6)
"कोरोनाच्या"  लाटा  काही  संपत  नाहीत , यापुढेही  त्या  येतच  राहतील
त्रिसूत्री  पाळणे  नियमानुसार ,या  गोष्टी  आहेत  आपल्याच  हातातील
काहीही  होवो , धीर  न  सोडता , "कोरोनावर"  आपण  मात  करू ,
आजपासूनच  नवं -अभियान ,नवं -योजना , पुन्हा  एकदा  नव्याने  करू  सुरु .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.01.2022-रविवार.