पक्षी उडूनी गेले …….!

Started by Satish Choudhari, April 22, 2010, 04:23:01 PM

Previous topic - Next topic

Satish Choudhari

पक्षी उडूनी गेले.... घरटे सोडुनी गेले...
जाता जाता म्हणूनी गेले.....
आता कुणाला गाशील गीता.... !! ध्रु !!

घरटे प्रेमाचे बांधीले कुणी
प्रेमाला आता बांधीले कुणी
पक्षी नाही घरट्यात
प्रेम नाही प्रेमात
कुठे आली ही आपली कथा....
आता कुणाला गाशील गीता....

शब्द संपले हसू थांबले
डोळ्यांतील माझ्या आसु संपले
वादळ उठले मनात
भरतीच्या सागरात
तुफान घेऊनी आल्या लाटा....
आता कुणाला गाशील गीता....

पक्षी उडूनी गेले.... घरटे सोडुनी गेले...
जाता जाता म्हणूनी गेले.....
आता कुणाला गाशील गीता.....

--- सतिश चौधरी