"०२-जानेवारी–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, January 02, 2022, 05:21:04 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०२.०१.२०२२-रविवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                   "०२-जानेवारी–दिनविशेष"
                                  ------------------------


अ) ०२ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
   -------------------------------

१७५७: प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नवाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.

१८८१: लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.

१८८५: पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.

१९०५: मांचुरियातील पोर्ट ऑर्थर सिटी येथील लढाईत जपानी सैन्याने रशियाचा पाडाव केला.

१९३६: मध्य प्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना झाली.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी मनिला, फिलिपाइन्सवर ताबा मिळवला.

१९४५: दुसरे महायुद्ध – जर्मनीच्या वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी फ्रेंच, बेल्जियम आणि हॉलंड मधील विमानतळांवर हल्ले केले.

१९५१: रशियाने ल्युना-१ हे अंतरिक्षयान चंद्राच्या दिशेने प्रक्षेपित केले.

१९५४: राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली.

१९८५: पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांची नवी दिल्ली येथे पथनाट्य करत असतानाच निर्घृण हत्या.

१९९८: डॉ. सरोजिनी बाबर यांना पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत गोवारीकर यांच्या हस्ते सन्माननीय डी. लिट. पदवी प्रदान केली.

१९९९: अमेरिकेत हिमवादळात मिल वॉकीमध्ये १४ इंच तर शिकोगामध्ये १९ इंच बर्फ पडला. शिकागोचे तापमान -‌‍१३°F इतके कमी झाले.

२०००: संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते प्रकाशन.

२०००: पनामा सरकारने ८५ वर्षांच्या कालखंडानंतर पनामा कालव्याचा पूर्ण ताबा घेतला.

=========================================

ब) ०२ जानेवारी रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१९३२: भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते जॉनी बक्षी यांचा जन्म. (निधन: ५ सप्टेंबर २०२०)

१९२०: अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि विज्ञानकथालेखक आयझॅक असिमॉव्ह यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल १९९२)

१९३२: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट १९८५)

१९५९: भारीतय क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांचा जन्म.

१९६०: भारतीय क्रिकेटपटू रमण लांबा यांचा जन्म. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९९८)

=========================================

क) ०२ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१३१६: दिल्लीचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजी यांचे निधन.

१९३५: स्वातंत्र्यसैनिक, टिळकांच्या विचारसरणीचे मध्य प्रांताचे काँग्रेस नेते, वकील मोरेश्वर वासुदेव तथा नरकेसरी अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १८८६)

१९४३: हुतात्मा वीर भाई कोतवाल यांचे निधन.

१९४४: अस्पृश्यता निवारण हे जीवनध्येय मानलेले व्यासंगी समाजसुधारक महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन. (जन्म: २३ एप्रिल १८७३)

१९५२: व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार जो डेव्हिडसन यांचे निधन.

१९८९: मार्क्सवादी विचारसरणीचे पथनाट्यकार, लेखक, दिगदर्शक, कवि आणि गीतकार सफदर हश्मी यांचे निधन.  (जन्म: १२ एप्रिल १९५४)

१९९९: भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या विमला फारुकी यांचे निधन.

२००२: पर्यावरणवादी अनिल अग्रवाल यांचे निधन.

२०१५: भारतीय हवामान शास्त्रज्ञ वसंत गोवारीकर यांचे निधन. (जन्म: २५ मार्च १९३३)

२०१६: भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे माजी सरचिटणीस आणि स्वातंत्र्यसेनानी अर्धेन्दू भूषण बर्धन यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२४)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.01.2022-रविवार.