धनगर गीत-" धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा "

Started by Atul Kaviraje, January 03, 2022, 05:46:53 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

      मला आवडलेले एक लोकप्रिय धनगर गीत ऐकुया. या गाण्याचे बोल आहेत - " धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा "


धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा.

वसाड गावाचा धनगर राजा, राणा वनातून मेंढरं पाळी
त्याच्या पायी तो रानी वणीच्या, काटेरी कुटेरी बाभळी ढाळी
वसाड गावाच्या धनगर राजाचा, काळा कुत्रा त्याचा सेना रे पती
खायला लागती पन्नास भाकरी, ईळभर तो मेंढ्या भवती.

धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा.

वसाड गावाच्या धनगर राजाला सांगून आली रे काळी नवरी
बावरा राजा गब्बरया मेंढीच्या लाजून गळ्यात मिठी रे मारी
वसाड गावाच्या धनगर राजाला सांगून आली रे काळी नवरी
बावरा राजा गब्बरया मेंढीच्या लाजून गळ्यात मिठी रे मारी.

वसाड गावाच्या धनगर राजाच काळया नवारीशी झाल लगीन
धनगर राजा, काळी नवरी, लग्नांत जेवली अडीच पान
वसाड गावाचा धनगर राजा जेजुरी गावाला गोंधळ घाली
शेकाट्या खाली काळ्या घोंगडीचा मांडव मांडला आभाळा खाली.

धनगर राजा वसाड गावाचा येळकोट गातो मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा.

वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले गोत
आंधळा गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात
वसाड गावाच्या धनगर राजाच्या अंधाऱ्या मांडवी पेटले पोत
आंधळ्या गोंधळी संबळ वाजवी, लंगड्या मुरळ्या नाचल्या सात.

वसाड गावाच्या धनगर राजाची काळी नवरी रानांत गेली
वाघाच्या पाठीत मारली लाथ, उंदराला भ्याली, दूर पाळली
वसाड गावाच्या धनगर राजान पोराच्या पायी नवस केला
पोरं झाली बारा, पोरी झाल्या तेरा
गब्बरया केसांचा मेंढा मारला.

धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा.

वसाड गावच्या धनगर राजाचा घूम-घूम-घमम वाजतो ढोल
फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य देवाचा सुटला तोल.

वसाड गावच्या धनगर राजाचा घूम-घूम-घमम वाजतो ढोल
फाटले धरणी, तुटल्या तारा, सूर्य देवाचा सुटला तोल.

वसाड गावचा धनगर राजा हसतो, नाचतो, घालतो पिंगा
बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा
वसाड गावचा धनगर राजा, हसतो, नाचतो, घालतो पिंगा
बक्खळ बकरी, बक्खळ मेंढ्या, रानी बाभळीला बक्कळ शेंगा.

धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा.

धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा.

धनगर राजा वसाड गावाचा, येळकोट गातो मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा
मल्हारी देवाचा, मल्हारी देवाचा.

===============
कवी : गो नि दांडेकर
गायक : सचिन  पिळगावकर
===============


                              (साभार आणि सौजन्य-रॉकोल.कॉम)
                               (संदर्भ-सागरिका म्युझिक-यू ट्यूब)
                            ---------------------------------- 


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.01.2022-सोमवार.