चारोळ्या-"वृक्ष-रोपणाची होतेय जय्यत तयारी,रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये भर दुपारी"

Started by Atul Kaviraje, January 04, 2022, 01:31:28 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

  विषय : रत्नागिरी  येथे  रस्त्यांवरील  खड्ड्यांमध्ये  वृक्ष -रोपण  करून  तरुणांचा  सरकार -विरुद्ध  निषेध
              वास्तव -मार्मिक  रस्ता-खड्डा  विरोधी  आंदोलन  चारोळ्या
       "वृक्ष-रोपणाची होतेय जय्यत तयारी,रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये भर दुपारी"
--------------------------------------------------------------------------


(1)
"वृक्ष -रोपणास  खड्डा"  आधीच  रेडिमेड  तयार  होता
"रस्ता" -कंत्राटदारांची  सिमेंट -रेती -वाळू  भेसळीची  ही  अपूर्व  देणगी  होती
आता  उदघाटनI  नेत्यांच्या  आगमनाची  वाट  पहात  होती  जनता ,
"रस्त्यांवरील  खड्ड्यांत"  होणार  होते  "वृक्ष -रोपण" , न  भूतो  न  भविष्यती .

(2)
आता  "वृक्ष -रोपणास"  कसदार ,सुपीक  जमिनीची  नव्हती  गरज
"रस्त्यावर"  जागोजागी  साऱ्या  शहरभर , "खड्ड्यांची"  आधीच  सोय  झाली  होती
"वृक्ष" -मित्र  खुश  होते ,समाधानी  होते ,त्यांना  भविष्य  दिसत  होते ,
"रस्त्या -रस्त्यांवर"  बहरलेले  भरगच्च  "वृक्ष" -जंगल  त्यांच्या  स्वप्नात  येत  होते .

(3)
"वृक्ष"  वाचवा ,"वृक्ष"  वाढवा ,"वृक्ष"  लावा ,"वृक्ष"  जपा
सारी  जनता  उत्साहाने  कामाला  लागली  होती ,एकचं  ध्यास  होता
सारी  वनराई , जंगल -जमीन ,"वृक्ष" -राईनी  अक्षरशः  भरून  गेल्यामुळे ,
लोकांनी आपला मोर्चा"वृक्ष-रोपणासाठी" आता,"रस्त्यांवरील खड्ड्यांकडे" वळविला होता .

(4)
जिकडे  पाहावे  तिकडे  हिरवाई ,हरीताई , नजरेत  भरत  होती
प्रदूषणाचे  नामो -निशाणही , नावालाही ,खुणेलाही  शिल्लक  नव्हते
"रस्त्यावरले  खड्डे" , एकप्रकारे  मानवाला  वरदानच  ठरले  होते ,
"वृक्ष"  वाढवून  त्यांनी  लोकांना  पुन्हा  जगण्यास  एक  मोकळा  श्वास  दिला  होता .

(5)
"रस्त्यावरील"  सारे  दळण -वळण , चलन -वलन   पूर्णपणे  थांबले  होते
"रस्त्या -रस्त्यांवर"  ठीक -ठिकाणी  महाकाय  "वृक्ष  खड्ड्यांत"  उभे  राहिले  होते
सरकारच्या  निषेधार्थ  "रस्ता -खड्ड्यात"  लावलेले  तेव्हाचे  इवलेसे  रोपटे ,
आज  मानवास  जगण्याचा  एक  नवा  आधार ,एक  आदर्श  देत  होते .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.01.2022-मंगळवार.