उमजत नाही

Started by शिवाजी सांगळे, January 04, 2022, 04:32:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

उमजत नाही

कितीही झाले तरी विसरता येत नाही...
असूनही स्मरणात ते बोलता येत नाही...

येतो बहर फुलांना जातो बहर फुलांचा
ऋतूही स्वतः एकसारखा थांबत नाही...

मापदंड जगण्याचे इथे भिन्न प्रत्येकाचे
ताळमेळ म्हणून का दोघात होत नाही...

तोडावी सर्व बंधने जरी ठरवतो कुणी
सहजी तरी तोडण्यास धजावत नाही...

वेदना म्हणू की, दु:ख हे असले कसे..?
करूनही विचार काहीच उमजत नाही...

©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९