तळहातांच्या जखमांना .......

Started by Satish Choudhari, April 22, 2010, 04:27:10 PM

Previous topic - Next topic

Satish Choudhari


तळहातांच्या जखमांना
मलम कसे मी लावू
आठवणींच्या झुल्यांचे
झोके कसे मी थांबवू ....

प्रेमाची कुठे पंढरी
कुठे प्रेमाचे वारकरी
माझ्या प्रेमाच्या विठुरायाला
कोण्या मंदिरी मी पाहू...


ऊन्हातान्हाची पर्वा आता
ह्या वाटेवरती कसली
तुझेच नाम:स्मरण राही
अशी ना भक्ती दिसली
मनाच्या कोऱ्या पानांवरचे
ते नाव कसे मी मिटवू.......

तळहातांच्या जखमांना
मलम कसे मी लावू
आठवणींच्या झुल्यांचे
झोके कसे मी थांबवू.....


कवी:- सतिश चौधरी ...


gaurig


santoshi.world

hya oli mast ahet :)


तळहातांच्या जखमांना
मलम कसे मी लावू
आठवणींच्या झुल्यांचे
झोके कसे मी थांबवू ....