चारोळ्या-"दारू नको,दूध प्या,आजच नाही,रोज प्या,दारू हे विषच,दूध हे अमृतच"

Started by Atul Kaviraje, January 05, 2022, 01:39:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : पुणे  येथे , फर्ग्युसन  कौलेजसमोर दारू-विरोधी समाजसेवी  संस्थेचा , "दारू नको-दूध  प्या ", हा  अभिनव  उपक्रम .
               दारू  सोडा , दूध  प्या -अनोखा  उपक्रम -चारोळ्या
     "दारू नको,दूध प्या,आजच नाही,रोज प्या,दारू हे विषच,दूध हे अमृतच"
--------------------------------------------------------------------------


(1)
पुणे ,फर्ग्युसन  कौलेजसमोरील  रस्ता ,होता  गजबजलेला , होते  पथनाट्य  सुरु
विद्यार्थ्यांनी , संस्थेने  विषय  मांडला  होता , सोडायची  कशी  "दारू"
वर्षारंभी -२०२२ -च्या  प्रथम -दिनी ,उल्हासमय  पहाट  होती ,थंडीची  लाट  होती ,
पथनाट्याद्वारे  होता  सुरु  कार्यक्रम , पहाटे  पहाटे  पाहण्यास  बरीच  गर्दी  होती .

(2)
काहीतरी होते संचारलेले या मुलांच्या अंगात,त्यांनी बहुदा ते पाहिलेले, अनुभवलेले असावे
"दारू" प्यालेला मनुष्य कसाही वागतोय, मारतोय,पिटतोय, त्याला शुद्ध,ताळतंत्रच नसावे
उद्ध्वस्त  कुटुंब ,उपासमार ,कुटुंबाची  वाताहत , यातून  त्यांनी  घेतले  होते  धडे ,
कळकळीने सादर करीत होते नाट्याद्वारे,"दारूच्या" वाईट परिणामाचे वाचीत होते पाढे .

(3)
"दारू"  सोडा ,"दूध"  प्या ,"दारू"  वाईट ,"दूध"  चांगले ,काव्यात  ते  होते  गात
एवढुश्या  मुलांना  कुठून  आलीय  एवढी अक्कल ,लोक  कौतुकाने  होते  पाहात
दुष्परिणाम सांगत होते "दारूचे",चांगले परिणाम वदत होते "दुधाचे",आपल्या नाट्यातून ,
वाईट  संगत  सोडा , चांगली  संगत  धरा ,हे  मांडीत  होते  ते  आपल्या  गाण्यातून .

(4)
असे अनेक"दारू-दूध"उपक्रम राबवले जात होते,नवं-वर्षाच्या सुमुहूर्तावर साऱ्या महाराष्ट्रभर
दाखले दिले  जात  होते ,प्रत्यक्ष  समोरच  भरलेल्या  ग्लासातून  "दारूचे"  अन  "दुधाचे"
"दारूच्या" बाटल्या फोडल्या जात होत्या,"दुधाने" भरलेल्या  ग्लासचे  वाटप  होत  होते ,
असा  संकल्प  "दारू-दुधाचा"  कधी  पहिला  नव्हता , कधी  ऐकलाही  नव्हता .

(5)
गर्दीमध्ये  होते  बरेच  तळीरामही , नाक  उडवीत  होते , खिल्ली  उडवीत  होते
म्हणे , "दारूचा"  त्याग  करा ,"दुधाचे"  सेवन  करा ,आम्हाला  शिकवताहेत
"दारूत"  जी  धुंदी ,नशा  आहे , ती  "दुधात"  कुठून  असे  सर्वाना  सांगत  होते ,
पण कुठेतरी आतला आवाज,त्यांना कोसत होता,त्यांना प्रायश्चित घे म्हणून  सांगत  होता .

(6)
सर्व  चारोळीकारांची  माफी  मागून ---
माझ्या  मते "दारू"प्यावी ,चांगली  प्यावी , पण  व्यसन  न  करता ,गटारात  न  लोळता
औषधी मात्रे-एवढीच घ्यावी,प्रमाणात,कळायला पण नको  लोकांस  गडाबडा  न  लोळता
स्वास्थ्य  जपण्यास  आवश्यकता  आहे ,दोन्हींची  वेगवेगळ्या प्रमाणात  अन  मात्रांत ,
"दारूचे"अल्प सेवन,अन  "दुधाचे"  भरपूर  सेवन ,इतर  दिनक्रमात  बदल  न  घडता .

(7)
शेवटी  आपले  आरोग्य  आपल्याच  हातात ,काय  खावे  अन  काय  पिऊ  नये
पण  हे  "दारू"-रुपी  विष  त्यजलेलेच  बरे ,त्याच्या  वाट्यास  कधीच  जाऊ  नये
सकस ,पूर्णाहार ,सर्व -गुणांनी  पोषक ,अश्या  गोरसाचे  सेवन  केव्हाही  चांगले ,
"दारू"  सर्वांनी  सोडावी ,"दुधाची"  कास  धरावी , साऱ्यांचेच  होईल  मग  भले .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.01.2022-बुधवार.