चारोळ्या-"विवाह व परीक्षा आल्यात एकाच दिने,विवाहाआधी परीक्षा दिलीय या वधूने"

Started by Atul Kaviraje, January 06, 2022, 01:57:14 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : गुजरातमधील  राजकोट  येथील  शिवांगी  बगथारिया यांनी  विवाहाच्या  दिवशीच  सोशल  वर्क  विषयाची  परीक्षा  दिली . परीक्षा  आणि  लग्न  एकाच  दिवशी  आणि  मुहूर्त सकाळीच  आल्यामुळे  त्यांनी  परीक्षेला  प्रथम  प्राधान्य  दिले , आणि  नंतरच  त्या  बोहोल्यावर  चढल्या . वधूचा  पोशाख  घालूनच  त्या  परीक्षा  केंद्रावर  परीक्षा  देण्यास  आल्या  होत्या , व  त्यांना  परीक्षा  स्थळावर  सोडण्यास  त्यांचे  पती  आणि  इतर कुटुंबीयही  आले  होते .
                 परीक्षा  आधी  की  विवाह  आधी  ? -चारोळ्या
   "विवाह व परीक्षा आल्यात एकाच दिने,विवाहाआधी परीक्षा दिलीय या वधूने"
--------------------------------------------------------------------------


(1)
गुजरात ,राजकोटमध्ये  इतिहास  रचलाय  "बगथारियांच्या  शिवांगीने"
प्राधान्य  दिलंय  "विवाहाआधी" , सोशल  वर्क  "परीक्षेस"  बसण्या  तिने
सारे  वऱ्हाड  निघालंय  तिला  पोचविण्या ,सदिच्छा  देण्या  "परीक्षा"  हौलमध्ये ,
सजलेली  "शिवांगी"  वधू  खुलत  होती , लाल  रंगाच्या  भडक , चमकदार  साडीमध्ये .

(2)
सोबत  नवरदेवही  नटून -थटून ,शेरवानी  घालून , कंबरेस  खोचून  तलवार
देत  होते  तिला  GOOD  -LUCK, "परीक्षा"  लिहिण्या , देत  होते  तिला  आधार
अनोखा  हा  सोहळा  विवाहाचा , कधी  न  पहिला , कधी  न  ऐकलेला ,
सकाळचा "विवाह"मुहूर्त टाळून,"शिवांगी"आली होती परीक्षा  केंद्रावर  परीक्षा  देण्याला .


(3)
आश्चर्य  इतर  विद्यार्थ्यांच्या , "परीक्षार्थींच्या"  चेहऱ्यावर  दिसत  होते  सुस्पष्ट
आधी  "परीक्षा"  देईन , नंतरच  करीन  "लग्न" , "शिवांगीचा"  निर्धारच  होता  स्पष्ट
आधी  "लगीन"  कोंढाण्याचे , मग  रायबाचे , तेव्हा  केला  होता  पुकारा  तानाजीने ,
कर्तव्य -कठोर  "शिवांगीला"  पाहून , उर  भरून  आले  होते  सर्वांचे  अभिमानाने .

(4)
"शिवांगी" आहेत  आदर्श  आज , या  नव्या  पिढीच्या ,तरुणाईच्या
जीवनातील  एका  महत्त्वाच्या  क्षणालाही  त्यांनी  "परीक्षेपुढे"  कमी  लेखले  होते
म्हणत  होत्या , एक  वेळ  मुहूर्त  टळेल , पण  हि  "परीक्षा"  लांबणीवरच  पडेल ,
माझे  भवितव्य ,पुढील  आयुष्य , हे  माझ्या  शिक्षणावरच  अवलंबून  असेल .

(5)
पतीला  आदर  आहे  त्यांचा , सासरच्या  मंडळींना  त्यांचा  अभिमान  आहे
शिकलेली  सून  या  आजच्या  युगात  आमच्या  घरी  चालून  आली  आहे
आता  सारे  घर  शिकेल , शिकलेली  एक  स्त्री , सारे  घरचं  बदलून  टाकेल ,
"शिवांगीने" , या  "लग्न"  मुहूर्ताच्या  निमित्ताने  एक  अभिनव  पाऊल  उचलले  आहे .

(6)
परीक्षेस  उपस्थित  राहून  "शिवांगी"  आता  अंतर-पाटासमोर  उभी  आहे
मंत्र -पठण , मंगलाष्टकांच्या  गजरात , तिच्या  डोईवर  अक्षता  पडत  आहेत
एक  "परीक्षा"  पार  पडून  आता  ती  जीवनातील  दुसरी  "परीक्षा"  देत  आहे ,
या दोन्ही"परीक्षांत" मी नक्कीच होईन चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण,याचा तिला विश्वास आहे .

(7)
आज हा "लग्न" -सोहळा  विशेष  खुलला  आहे , राजकोटच्या  "शिवांगीचे"  नाव  होतंय
पत्नीचा  हा  कर्तव्य -कठोर  निर्धार , पतीच्या  मनास  प्रेरणा  देऊन  जातोय
म्हणतोय , सहचारिणीच्या  रूपात  तुला  स्वीकारून "शिवांगी" मी  झालोय  धन्य ,
शिक्षणाचे  महत्त्व  तुला  कळलंय , तू  नाहीस  साधारण , तू  आहेस  अनन्य .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-06.01.2022-गुरुवार.