"०७-जानेवारी–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, January 07, 2022, 11:04:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०७.०१.२०२२-शुक्रवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                  "०७-जानेवारी–दिनविशेष"
                                 ------------------------


अ) ०७ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
   -------------------------------

१६१०: गॅलेलिओ यांनी दुर्दार्शीच्या सहाय्याने इयो, युरोपा, गॅनिमिडी आणि कॅलिस्टो या गुरूच्या चार उपग्रहांचा शोध लावला.

१६८०: मुंबई कौन्सिलने शिवाजी महारांजाबरोबर करायच्या कराराचा मसुदा तयार केला.

१७८९: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन निवडून आले.

१९२२: पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरुन १८ महिन्यांची शिक्षा झाली.

१९२७: न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.

१९३५: कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमीचे (INSA) उद्‌घाटन झाले.

१९५९: क्यूबातील फिडेल कॅस्ट्रो यांच्या सरकारला अमेरिकेने मान्यता दिली.

१९६८: अमेरिकेचे सर्व्हेयर यान चंद्राच्या टायको या विवराच्या किनारी उतरले.

१९७२: कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.

१९७८: एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलू जवळील महासागरात बेपत्ता झाली.

=========================================

ब) ०७ जानेवारी रोजी झालेले जन्म.
  -----------------------------

१९४७: भारतीय चित्रपट अभिनेते वरून बडोला यांचा जन्म. (निधन: २३ नोव्हेंबर २०२०)

१८९२: क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचा जन्म. (निधन: १९ एप्रिल १९१०)

१८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (निधन: २१ मे १९७९)

१९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (निधन: १९ एप्रिल २००८)

१९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (निधन: २० जून २००८)

१९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.

१९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.

१९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.

१९६७: सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचा जन्म. (निधन: २९ एप्रिल २०२०)

१९७९: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.

=========================================

क) ०७ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.
    ----------------------------

१९८९: दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट मिचेनोमिया हिरोहितो यांचे निधन. (जन्म: २९ एप्रिल १९०१)

२०००: विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक डॉ. अच्युतराव आपटे यांचे निधन.

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.01.2022-शुक्रवार.