"०९-जानेवारी–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, January 09, 2022, 05:31:25 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-०९.०१.२०२२-रविवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "०९-जानेवारी–दिनविशेष"
                                    -----------------------


अ) ०९ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
   -------------------------------

१७६०: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला.

१७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले.

१८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला नेण्यात आले.

१९१५: महात्मा गांधी अफ्रिकेतुन भारतात आले.

२००१: नव्या सहस्त्रकातील पहिल्या महाकुंभमेळ्याला अलाहाबाद येथे प्रारंभ झाला.

२००१: नव्या सहस्रकातील पहिले खग्रास चंद्रग्रहण दिसले.

२००२: भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड विरूद्ध एकदिवसीय मालिका जिंकली.

२००२: महात्मा गांधी भारतात परतल्या बद्दल ९ जानेवारी हा भारतीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्याचे योजण्यात आले.

२००७: स्टीव जॉब्स यांनी पहिला आयफोन प्रकाशित केला.

=========================================

ब) ०९ जानेवारी रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१९१३: अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९९४)

१९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म.

१९२२: जन्माने भारतीय असलेले अमेरिकन नोबेल पारितोषिक विजेते हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११)

१९२६: चित्रपट अभिनेते कल्याण कुमार गांगुली तथा अनुप कुमार यांचा जन्म. (मृत्यू: २० सप्टेंबर १९९७ – मुंबई)

१९२७: सौंदर्यशास्त्राचे अभ्यासक आणि समीक्षक रा. भा. पाटणकर यांचा जन्म.

१९३४: पार्श्वगायक महेंद्र कपूर यांचा जन्म. (मृत्यू: २७ सप्टेंबर २००८ – मुंबई)

१९३८: गणिती चक्रवर्ती रामानुजम यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९७४)

१९५१: ख्यालगायक व पं. कुमार गंधर्व यांचे पट्टशिष्य पं. सत्यशील देशपांडे यांचा जन्म.

१९६५: नृत्यदिग्दर्शक फराह खान यांचा जन्म.

=========================================

क) ०९ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१८४८: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्षेल यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५०)

१८७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८)

१९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १ जून १८४२)

२००३: गीतकार व कवी कमर जलालाबादी यांचे निधन.

२००४: पखवाज वादक शंकरबापू आपेगावकर यांचे निधन.

२०१३: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ जेम्स बुकॅनन यांचे निधन. (जन्म: ३ ऑक्टोबर १९१९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.01.2022-रविवार.