इयत्ता १ली ते ७वी (पाहिली माला) मधील बालभारतीच्या कवितेची गाणी

Started by charudattasawant, January 11, 2022, 08:19:32 PM

Previous topic - Next topic

charudattasawant

मला माझ्या लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात असलेल्या सर्वच कविता आवडत असत.

हि आवड आजही कायम असून वाचक आणि श्रोत्यांसाठी त्या आवडीला नवीन रुपात सादर केले आहे. 

बालभारतीच्या कवितेची गाणी ही लेखमाला माझ्या ब्लॉगवर मी केलेली आहे.

त्यात मराठी इयत्ता १ली ते ७वी पर्यंतच्या बालभारतीच्या पुस्तकातील निवडक कवितांचे गाण्यात रूपांतर झालेलं आहे, त्या सर्व कविता वाचावयास आणि ऐकावयास मिळतील. एवढेच नव्हे तर बालभारतीने ह्या कवितेच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रिका काढल्या होत्या त्यावरील गाणी आणि अधिक माहिती मी दिलेली आहे.

यातील काही गाणी पुढीलप्रमाणे:
देवा तुझे किती सुंदर आकाश ... (इयत्ता १ ली, प्रथम माला)
या बाई या .... (इयत्ता १ ली, प्रथम माला)
हळूच या हो ..... (इयत्ता २ री, प्रथम माला)
मझ्या मामाची रंगीत गाडी हो  ..... (इयत्ता २ री, प्रथम माला)
टपटप पडती अंगावरती  ..... (इयत्ता ३ री, प्रथम माला)
लेझीम चाले  जोरात ..... (इयत्ता ३ री, प्रथम माला)
या बालांनो सारे या  ..... (इयत्ता ४थी, प्रथम माला)
घाल घाल पिंगा वाऱ्या ..... (इयत्ता ५ वी, प्रथम माला)
या झोपडीत माझ्या ..... (इयत्ता ६वी, प्रथम माला)
गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या  ..... (इयत्ता ७वी, प्रथम माला)

या शिवाय काही गाण्यांची दोन किंवा तिन रूपे ऐकावयास मिळतील. उदा. घाल घाल पिंगा वाऱ्या हे गाणे फैयाज, सुमन कल्याणपूर, कालिंदी केसकर यांच्या आवाजात ऐकू शकाल.

माझ्या ब्लॉगवरील लेखांची लिंक आहे: https://charudattasawant.com/geetmala/

तसेच आमच्या रेडिओ जयमालावर ह्या लेखांचे श्राव्य रूपांतर केले आहे ते खालील लिंकवर ऐकू शकता:
https://charudattasawant.com/radio-jaymala-playlists/

चारुदत्त सावंत
८९९९७७५४३९
९२२५६०५९६८