"११-जानेवारी–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, January 11, 2022, 10:42:15 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-११.०१.२०२२-मंगळवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "११-जानेवारी–दिनविशेष"
                                    -----------------------


अ) ११ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
   ------------------------------

१७८७: विल्यम हर्षेल यांनी टिटानिया आणि ओबेरॉन या युरेनसच्या चंद्राचा शोध लावला.

१९२२: मधुमेहावर उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.

१९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कुआलालंपूर जिंकले.

१९६६: गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.

१९७२: पूर्व पाकिस्तानचे बांगला देश असे नामकरण करण्यात आले.

१९८०: बुद्धिबळाच्या खेळात नायजेल शॉर्ट वयाच्या १४ व्या वर्षी जगातील सर्वात लहान ईंटरनॅशनल मास्टर झाला.

१९९९: कमाल जमीनधारणा कायदा रद्द करणारा वटहुकूम केंद्र सरकारकडून जारी.

२०००: छत्तीसगड उच्‍च न्यायालयाची स्थापना.

२००१: एस. पी. भरुचा यांनी भारताचे ३० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.

=========================================

ब) ११ जानेवारी रोजी झालेले जन्म.
   ---------------------------

१८१५: कॅनडाचे पहिले पंतप्रधान जॉन ए. मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १८९१)

१८५८: हिंदी साहित्यिक श्रीधर पाठक यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२६)

१८५९: ब्रिटिश मुत्सद्दी आणि भारताचे व्हॉइसराय लॉर्ड कर्झन यांचा जन्म. (मृत्यू: २० मार्च १९२५)

१८९८: ज्ञानपीठ विजेते साहित्यिक वि. स. खांडेकर यांचा जन्म.

१९४४: झारखंडचे ७ वे मुख्यमंत्री आणि खासदार शिबू सोरेन यांचा जन्म.

१९५५: उपशास्त्रीय व नाट्यसंगीत गायिका आशा खाडिलकर यांचा जन्म.

१९७३: क्रिकेटपटू खेळाडू द. ग्रेट इंडियन वॉल राहुल द्रविड यांचा जन्म.

=========================================

क) ११ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.
   ---------------------------

१९२८: इंग्रजी कादंबरीकार थॉमस हार्डी यांचे निधन. (जन्म: २ जून १८४०)

१९५४: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचे निधन. (जन्म: २८ फेब्रुवारी १८७३)

१९६६: भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांचे निधन. (जन्म: २ ऑक्टोबर १९०४)

१९९७: अर्थतज्ञ भबतोष दत्ता यांचे निधन. (जन्म: २१ फेब्रुवारी १९११)

२००८: मराठी लेखक यशवंत दिनकर तथा य. दि. फडके यांचे निधन. (जन्म: ३ जानेवारी १९३१)

२००८: माउंट एव्हरेस्टवर सर्वप्रथम चढाई करणारे न्यूझीलंडचे गिर्यारोहक सर एडमंड हिलरी यांचे निधन. (जन्म: २० जुलै १९१९)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.01.2022-मंगळवार.