II मकर संक्रांति II-लेख क्रमांक-2

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:07:31 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II मकर संक्रांति II
                                           लेख क्रमांक-2
                                      --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

     या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात (Makar Sankranti 2022).या वर्षी हा सण 14 जानेवारी 2022 रोजी साजरा केला जाणार आहे.

     नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे 'मकर संक्रांत'. दान आणि पुण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांत हा जानेवारी महिन्यात आणि हिंदू पंचांगाप्रमाणे पौष महिन्यात येणारा एक महत्त्वपूर्ण सण आहे. या दिवशी सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या प्रक्रियेला संक्रांती म्हटलं जातं. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. म्हणून याला मकर संक्रांत म्हणतात (Makar Sankranti 2022).या वर्षी हा सण 14 जानेवारी 2022 रोजी साजरा केला जाणार आहे.

                       तीळ-गुळाचे महत्त्व काय?---

     संक्रांतिला तीळाचे फार महत्त्व आहे. मकर संक्रांतला तीळ आणि गूळ यांचे लाडू करण्याची पद्धत आहे. ही वेळ भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरुन त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरुन नातेसंबंध घट्ट करण्याची वेळ मानली जाते. या गोष्टीलाही वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने तीळ आणि गुळाने शरिराला उब मिळते. म्हणून या दिवशी तीळगुळ खाल्ल जातं.

                         उत्तरायण म्हणजे काय ?---

     सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. 21 मार्च ते 21 जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच 'उत्तरायण' असे म्हणतात. तर 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सूर्य दक्षिण दिशेला सरकतो. याला 'दक्षिणायन' असे म्हणतात. मकर राशीपासून मिथुन राशीपर्यंतच्या सूर्याच्या कालखंडाला उत्तरायण काल ​​म्हणतात. उत्तरायणामुळे दिवस मोठा आणि रात्र लहान होते.

                        मकर संक्रांतीचे उत्तम उपाय---

--मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याशी संबंधित दोष दूर करण्यासाठी लाल चंदन, तूप, मैदा, गूळ, काळी मिरी इत्यादींचे दान करा.
--चंद्र ग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी तांदळासोबतच कापूर, तूप, दूध, दही, पांढरे चंदन इत्यादींचे दान करावे.
--मंगळाचे दोष दूर करण्यासाठी गूळ, मध, मसूर, लाल चंदन इत्यादींचे दान करावे.
बुधाचा दोष दूर करण्यासाठी तांदळासोबत धणे, साखर मिठाई, सुक्या तुळशीची पाने, मिठाई, मूग, मध यांचे दान करावे.
--गुरु ग्रहाशी संबंधित दोष दूर करण्यासाठी मध, हळद, मसूर, रसाळ फळे, केळी इत्यादींचे दान करा.
--शुक्रदोषासाठी साखर मिठाई, पांढरे तीळ, जव, तांदूळ, बटाटा, अत्तर इत्यादी दान करा.
असे मानले जाते की या महान सणावर शनिदेव पिता सूर्यदेवाला भेटायला येतात. अशा स्थितीत सूर्यदेवासह शनिदेवाची उपासना आणि उपायही या दिवशी महत्त्वाचे ठरतात. जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल तर तो दूर करण्यासाठी मकर संक्रांतीच्या दिवशी काळे दान करा.

मृणाल  पाटील
-------------

                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-टीव्ही ९ मराठी.कॉम)
                   ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.