II मकर संक्रांति II-निबंध क्रमांक-१

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 12:15:34 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II मकर संक्रांति II
                                          निबंध क्रमांक-१
                                      --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गूळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

                         मकरसंक्रांत निबंध

     सन 2022 मध्ये, पंचांगानुसार, मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी 14 जानेवारी 2022, शुक्रवार रोजी साजरा केला जाईल. या दिवशी सूर्य धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करेल. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा या प्रक्रियेला संक्रांती म्हणतात. मकर संक्रांत ही सर्व संक्रांतांपैकी सर्वात महत्त्वाची मानली जाते. मकर संक्रांतीला खिचडीचा सण असेही म्हणतात. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे.

     मकरसंक्रांत हा एक सगळ्यांचा आवडता सण आहे. हा सण दरवर्षी १४ जानेवारीला येतो. या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगूळ देतात. तिळाचे लाडू तिळगूळ म्हणून दिले जातात. काहीजण सोबत साखरेचा हलवाही देतात.

     'तिळगूळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तिळगूळ सांडू नका, आमच्याशी कधी भांडू नका,' असे तिळगूळ देताना लोक म्हणतात. एकमेकांविषयी स्नेह निर्माण करणारा हा सण आहे.

     या दिवशी स्त्रिया एकमेकींना संक्रांतीचे वाण देतात. त्या वाणात ओला हरभरा, ऊस, बोरे व तिळगूळ यांचा समावेश असतो. या सणाला स्त्रिया काळी वस्त्रे परिधान करतात.

     या दिवशी पतंग उडवण्याचा उत्सवच असतो. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मनसोक्त पतंग उडवतात. आकाशात रंगीबेरंगी पतंगांची गर्दी उसळते. असा हा मकरसंक्रांत उल्हासाचा सण आहे.


                       (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी मी.कॉम)
                      -----------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.