II मकर संक्रांति II-शुभेच्छा क्रमांक-9

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 01:41:29 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                        II मकर संक्रांति II
                                         शुभेच्छा क्रमांक-9
                                      --------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१४.०१.२०२२-शुक्रवार आहे. मकर संक्रांतीचा खास पर्व-सण घेऊन हा शुक्रवार आला आहे. बाहेर थंडी आहे. तीळ-गुळाचे लाडू खाऊन शरीरात उब-स्नेह येत आहे. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींना मकर संक्रांतीच्या हार्दीक शुभेच्छा. " तीळ-गुळ घ्या, गोड-गोड बोला". या सणI-निमित्त वाचूया मकर संक्रांतीवर  विशेष लेख, इतिहास, महत्त्व, माहिती,पूजा, कथा, निबंध, सदिच्छा, शुभेच्छा आणि बरंच काही.

गोड गोड शब्दांचा फुलवा पाक,
स्नेहांचे तिळ मिळवा त्यात,
तिळावर फुलेल पाकाचा काटा,
प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा...
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा

मानत असते आपुलकी
म्हणून स्वर होतो ओला
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

तीळ तुझ्या गालावरचा
गूळ तुझ्या ओठावरचा
असा तिळगुळ दे प्रिये
हैपी मकर संक्रातीचा

नाते अपुले
हळुवार जपायचे...
तिळगुळ हलव्याच्या गोडी सोबत
अधिकाधिक दॄढ करायचे...
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...!

दुःख असावे तिळासारखे,
आनंद असावा गुळासारखा,
जीवन असावे तिळगुळासारखे, "भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा"!!

विसरूनी सर्व कटुता हृदयात ....
तिळगुळाचा गोडवा यावा...
दुःखे हरावी सारी,
आणि आयुष्य सुखाचा सोहळा व्हावा.
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

फक्त सण आला म्हणून गोड बोलू नका,
चुकत असेल तर समजून सांगा.
जमत नसेल तर अनुभव सांगा पण
सणापुरते गोड न राहता
आयुष्यभर गोड राहूया....
मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.


                     (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठीवारसI.कॉम)
                   ---------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.