चारोळ्या-"कृष्णाची द्वारका बदनाम झालीय,ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई सापडलीय"

Started by Atul Kaviraje, January 14, 2022, 02:49:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय : गुजरातेतील  द्वारकामध्ये  ATS कडून  १२०  कोटींचे  ड्रग्ज  जप्त
                          वास्तव -ड्रग्ज रॅकेट चारोळ्या
    "कृष्णाची द्वारका बदनाम झालीय,ड्रग्जच्या विळख्यात तरुणाई सापडलीय"
   -----------------------------------------------------------------


(1)
युगंधर ,युग -पुरुष ,राजयोगी ,योगीराज  हताशपणे  पाहतोय
"कृष्णाच्या  द्वारकेत"  आज  लज्जास्पद , लांच्छनास्पद  प्रकार  घडतोय
"द्वारकेचे"  नाव  घेतले  जातं  होतं  "कृष्णाच्या"  पराक्रमाने  अन  सुराज्याने ,
आज  भरलेत  "द्वारकेचे"  गल्ली -बोळ , कोने -कोपरे , "ड्रग्जच्या"  रॅकेटने .

(2)
मुंबईतल्या  "ड्रग्जची"  पाळे -मुळे  ATS -ने  खणून  काढलीत
खोदकाम  करता ,पाहता  त्याची  मुळे  गुजरातपर्यंत  पसरलीत
जगभर  पसरण्यास  वेळ  नाही  लागणार  या  विष -वल्लीस ,
आज  जणू  ग्रहणंच  लागलंय , "कृष्णाच्या"  या  पावन -पवित्र  "द्वारका" -माईस .

(3)
पण  असे  का  घडतेय , माणूस  का  जातोय  इतक्या  नीच  थराला  ?
गुन्हेगारी  का  पोचलीय  गूढ  डोहात , गेलीय  रसातळाला ?
तरुण -तरुणी  ओढले ,आकर्षिले  का  जातात  सहजी  "ड्रग्जकडे"  ?
आपणहून  सेविती ,अंगीकार  करिती ,आलिंगिती , ओढवून  घेती  चक्क  मरणाला  !

(4)
कितीतरी  आयुष्ये ,कितीतरी  घरे , झालीत  बरबाद  या  "ड्रग्जपायी"
भविष्य  नाही  या  तरुणाईचे , वाईट ,दुष्ट  संगतीत  वाहत  जाई
गुन्हेगारांना  जणू  सहज  पैसे  कमावण्याची  झालीय  पुष्कळ  घाई ,
"ड्रग्जचे"  सेवन  करता  त्यांच्यापुढे  यमदूतच (काळ) आ  वासून  उभा  राही  !

(5)
धडाकेबाज  ATS-ने  आज  मजबूत  विळखा  घालून ,धडका  मारल्यात
गुन्हेगारीचे  समूळ  उखडण्या  हे  "ड्रग्ज"  रॅकेट , त्यांनी  धडक  कारवाया  केल्यात
"कृष्णाच्या  द्वारिकेचे"  पावित्र्य , त्यांनी  अखंड  राखण्याची  धुरा  घेतलीय ,
ATS-ने  "द्वारकेत"  पुन्हा  एकदा , "कृष्ण" -चरणी  शपथ  वाहिलीय .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.01.2022-शुक्रवार.