"कोल्हापूरचा चमत्कार डोळ्यांनी पाहिलंIय,अख्खाच्या अख्खा डोंगरच गायब झालाय"

Started by Atul Kaviraje, January 15, 2022, 01:46:51 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

       विषय :कोल्हापूरचा  वाघजाईचा अख्खा  डोंगरच  गायब  झालाय
                           वास्तव  कोल्हापूर-चारोळ्या
  "कोल्हापूरचा चमत्कार डोळ्यांनी पाहिलंIय,अख्खाच्या अख्खा डोंगरच गायब झालाय"
-------------------------------------------------------------------------


(1)
"कोल्हापूरच्या  डोंगरांची"  सुदूर , सुंदर  रेघ
पहाता  पहाता विस्कटली  गेलीय
एखाद्या  जादूगाराच्या  स्टेज -शो  दृश्याप्रमाणे ,
"डोंगर"-माथ्यांची , सपाट  जमीन  झालीय .

(2)
"वाघजाई  डोंगर"  पूर्ण  पोखरला  गेलाय
"वाघजाई"  देवीचे  स्थान  डळमळीत  झालंय
एकुलती , कुल -स्वामींनी  रहिवासी गावकरी  भक्तांची ,
देवालयातील  तिच्या  भिंतींना  तडा  जाऊ  लागलाय .

(3)
आपल्या  स्वार्थासाठी  धन -दांडग्यांनी  करार  करून
मोठमोठे  प्रकल्प  "कोल्हापुरी  वाघजाईत"  राबवलेत
खाण -काम ,खोद -काम  करून , "डोंगराची"  माती -माती  करून ,
गरिबांचे  शेतीचे , दुग्ध -व्यवसायाचे  तीन -तेरा  वाजवलेत .

(4)
पन्हाळा  दुरून  पाहतोय  "वाघजाईची"  दुरावस्था
काही  पैश्यांसाठी  केलीय  धनिक -बाळांनी  "डोंगराची"  ही  अवस्था
भुई -सपाट  झालायं ,रया  गेलीय ,गेलीय  त्याची  शान ,
संरक्षक  भिंत  "वाघजाईची" ,होते  वैभव , उंच  होती  मान .

(5)
महाराष्ट्र  देश , "डोंगरांचा" -दगडांचा  राकट , कणखर
पूर्वी  मरहट्टा  म्हणायचा  महाराष्ट्र  गीत  गाऊन
त्याच  जागेच  माळरान  झालंय ,सपाट  झालीय  भुई ,
अश्या  आणि  किती  पोखरल्या  जाणार  आहेत  "डोंगराळ  वाघजाई"  ?


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.01.2022-शनिवार.