"१७-जानेवारी–दिनविशेष"

Started by Atul Kaviraje, January 17, 2022, 08:26:50 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज दिनांक-१७.०१.२०२२-सोमवार. जाणून घेऊया, आजच्या दिवसाचे "दिन-विशेष"


                                    "१७-जानेवारी–दिनविशेष"
                                   ------------------------


अ) १७ जानेवारी रोजी झालेल्या घटना.
   -------------------------------

१७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.

१९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.

१९४५: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.

१९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.

१९५६: बेळगाव – कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली.

२००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील सूर्या पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.

२००१: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर.

=========================================

ब) १७ जानेवारी रोजी झालेले जन्म.
   ----------------------------

१७०६: लेखक आणि संशोधक बेंजामीन फ्रँकलिन यांचा जन्म. (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)

१८९५: लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे १९७८)

१९०५: भारतीय गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांचा जन्म.

१९०६: भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मे २०००)

१९०८: चित्रपट निर्माते व दिग्दर्शक अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ एल. व्ही. प्रसाद यांचा जन्म. (मृत्यू: २२ जून १९९४)

१९१७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचा जन्म. (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)

१९१८: टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रुसी मोदी यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे २०१४)

१९१८: चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ 'माल अमरोही यांचा जन्म. (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)

१९३२: साहित्यिक मधुकर केचे यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९३)

१९४२: अमेरिकन मुष्टियोद्धा मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले यांचा जन्म.

=========================================

क) १७ जानेवारी रोजी झालेले मृत्यू.
   ----------------------------

१५५६: दुसरा मुघल सम्राट हुमायून यांचे निधन. (जन्म: ७ मार्च १५०८)

१७७१: पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन यांचे निधन.

१८९३: अमेरिकेचे १९वे राष्ट्राध्यक्ष रदरफोर्ड बी. हेस. यांचे निधन. (जन्म: ४ ऑक्टोबर १८२२)

१८९५: मराठी लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ विठ्ठल दत्तात्रय घाटे यांचे निधन.

१९३०: गायिका व नर्तिका अँजेलिना येओवार्ड ऊर्फ गौहर जान यांचे निधन. (जन्म: २६ जून १८७३)

१९६१: काँगोचे पहिले पंतप्रधानपॅट्रिक लुमूंबा यांचे निधन. (जन्म: २ जुलै १९२५)

१९७१: स्वातंत्रसैनिक, घटनातज्ज्ञ बॅ. नाथ बापू पै यांचे ह्रुदयविकाराने निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२२)

१९८८: अभिनेत्री लीला मिश्रा यांचे निधन.

१९९५: ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक डॉ. व्ही. टी. पाटील यांचे निधन.

२०००: गायक आणि अभिनेते सुरेश हळदणकर यांचे निधन.

२००५: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.

२००८: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स तथा बॉबी फिशर यांचे निधन. (जन्म: ९ मार्च १९४३)

२०१०: प. बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसू यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९१४)

२०१३: मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या ज्योत्स्‍ना देवधर यांचे निधन. (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)

२०१४: बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचे निधन. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)

=========================================


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.01.2022-सोमवार.