लशीकरण चारोळ्या-"लशीकरण करा,करूनच घ्या,अन्यथा जीवनावश्यक वस्तुंना तुम्ही विसरा!"

Started by Atul Kaviraje, January 18, 2022, 01:38:02 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

विषय : औरंगाबाद  येथे  लशीकरण  न  करणाऱ्यांवर , लशींचे  दोन्ही  डोस  न  घेणाऱ्यांवर  कडक ,कठोर  निर्बंध  केले  आहेत . त्यांना  जीवनावश्यक  वस्तू  म्हणजे , पेट्रोल ,गॅस ,सिलेंडर ,मौल  मध्ये  जाणे  किंवा  बाजार -पेठेत  जाण्याचीही  मनाई  केली  आहे . त्यांना  जवळ  जवळ  सर्व  ठिकाणी  प्रवेश  बंदीच  आहे .
             वास्तव -कोरोना  लशीकरण , अनोख्या  अटी -चारोळ्या
     "लशीकरण करा,करूनच घ्या,अन्यथा जीवनावश्यक वस्तुंना तुम्ही विसरा!"
--------------------------------------------------------------------------


(1)
कोरोनाचे  इतर  नवं -नवे  प्रकार , व्यापू  लागलेत  जगत , ही  धरा
दिवसेंदिवस  रूप  बदलतोय  आपले  कोरोना , करी  मानवावर  अचूक  मारा
"लशीकरण" हाच एक पर्याय , तुम्हाला  तारण्या  उगवलाय  हा , पहाट -प्रकाश  तारा ,
गैरसमज  दूर  करा , सरकार  म्हणताय ,"लस  घ्या" ,  समजून  घ्या  जरा .

(2)
जनतेत  काही  वाम -वादी  अजुनी  आहेत , विचार  त्यांचा  वाम -डावा -विषमच
गैरसमज  पसरलेत  जणू  काही  अंधश्रद्धाच , दिसून  येतेय  त्यांची  अप -प्रवृत्ती  प्रथमच
"लस  घेतली"  तरी  होईल  कोरोना , आम्ही  पाहिलंय  घडताना  हे  सर्वत्रच ,
पण या अज्ञानांना नाहीय कळतं,ही इम्म्युनिटी-वर्धक"लस",मृत्यूलाही देतेय शह-मातच.   

(3)
सरकारने  योजना  नवी  राबवलीय , औरंगाबादेत  केलेत  कडक  कायदे
"लशीकरण"नाही, दोन्ही  डोस  नाहीत , तर  मिळणार  नाहीत  तुम्हा  कसलेच  फायदे
"जीवनाश्यक वस्तुंना"मुकाल तुम्ही , राहाल वंचित, तुम्हाला  बाजार -पेठा  होतील  बंद ,
पेट्रोल ,गॅस ,सिलेंडर ,मौल -विना , तुमचे  जीवन  होईल  हळू -हळू  मंद .

(4)
"लशीकरण"  पूर्ण  करा , "जीवनोपयोगी  वस्तूंचा"  यथेच्छ  फायदा  घ्या
"लशीकरणापासून"  नका  पळू  दूर , गैरसमज  तुमचे  भिरकावून  द्या
जीवन  सुरक्षित  ठेवा , पुन्हा  मिळणार  नाही , प्रश्न  आहे  तुमच्या  स्वास्थ्याचा ,
"लशीकरण"  एकचं  सुमार्ग ,उपायचं , तुमचे  आयुर्मान  वाढण्याचा .

(5)
"लशीकरण"  कडक  कायदे  करून , सर्व  ठिकाणाची  मनाई , प्रवेश  बंदी  केलीय
जोवर  प्रमाण -पत्र  नाही , तोवर  "जीवनावश्यक  वस्तूंची"  उपलब्धी  लांबवलीय
जनतेच्या  भल्याचे ,हिताचेच  सांगतेय  सरकार , यात  काही  गैरविचार  नाही ,
आयुष्याचा ,स्वास्थ्याचा  प्रश्न  आहे  जनतेच्या , ही  नाहीय  सरकारची  तानाशाही .

(6)
तेव्हा  जनतेने  व्हावे  शहाणे , "लशीकरण"  करावे , दोन्ही  डोस  घ्यावेत
कोरोना  काही  बधत  नाही , थांबत  नाही , हात -पाय  आपले  पसरतंच  राही
आता तिसऱ्या डोसचाही(BOOSTER DOSE),विचार करतेय सरकार वाचण्याचा नव्या  संक्रमणापासून ,
सुरुवात करूया, या  शुभ  कार्याची, "लसीकरणाची" , साऱ्यांनी  आज -आता -पासून .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.01.2022-मंगळवार.