चारोळ्या"रक्त-दानाचे महत्कार्य हातातूनघडतंय,STकर्मचाऱ्यांत माणुसकीचे दर्शनहोतंय"

Started by Atul Kaviraje, January 19, 2022, 01:41:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय : रत्नागिरी  येथे  १५०  ST कर्मचाऱ्यांनी  गांधी  STYLE-ने  रक्तदान  करून  आंदोलन  केले .
       वास्तव -ST कर्मचाऱ्यांचे  रक्त -दान  करून  अनोखे  आंदोलन-चारोळ्या
   "रक्त-दानाचे महत्कार्य हातातून घडतंय,ST कर्मचाऱ्यांत माणुसकीचे दर्शन होतंय"
-------------------------------------------------------------------------


(1)
धुळे  ST बस  आगारात  आज , "रक्त -दान"  शिबीर  भरले  होते
कनात  टाकून ,बेडसची  सोय  करून ,आगाराला  छावणीचे  स्वरूप  आले  होते
१५०  ST कर्मचाऱ्यांच्या  "रक्ताचे"  आज  बलिदान  होत  होते , क्रांती  होत  होती ,
त्यांच्यातील  "माणुसकीचे"  दर्शन  घडत  होते , संपाला  अनोखे  वळण  लागले  होते .

(2)
"रक्त -दान"  करून  या  ST कर्मचाऱ्यांनी  आज  महान  कार्य  केले  होते
"रक्त -दात्यांची"  भूमिका  वठवून  रुग्णांना  त्यांनी , सर्व -श्रेष्ठ  दान  दिले  होते
सरकारचे  लक्ष  जावो  वा  न  जावो , आम्ही  "माणुसकी"  दाखवून  देऊ ,
म्हणती , असेच  जीवन -दान  देण्याचे  काम  आम्ही  यापुढेही  करत  राहू  !

(3)
त्यांच्या  या  "रक्ताचे"  बलिदान , सरकारला  कळून  येईल  का  ?
त्यांच्या  या  पाठच्या  भावना , सरकारला  उमगतील  का  ?
अनोखे  पाऊल  त्यांचे  या   अनोख्या  आंदोलनातील , प्राण -रक्षणाचे ,
एकार्थी , ST कर्मचाऱ्यांनी  व्रतच  घेतलंय , जणू  समाज -सेवेचे .

(4)
काय  त्यांचा  हा  मनो -निग्रह , या  परिस्थितीतही  त्यांना  हे  सुचतंय
एक  बाजू  वगळता  आंदोलनाची , त्यांना  समाजाचे  हितच  दिसतंय
आधीच  वाहून  घेतलं  होत  त्यांनी , समाजास ,जनतेस  या  नोकरीतून ,
आताही  करताहेत  ते  प्राण -रक्षण  रुग्णांचे , गरजूंचे  त्यांच्या  "रक्त -दानातून" .

(5)
एक  अनोखे  समाज -कार्य ,जन -सेवा  आज  त्यांच्या  हातून  घडतेय
त्यांची  आंतरिक  भावना  या  कृतीतून  स्पष्टपणे  इथे  जाणवतेय
सारे  कळूनही  सरकारने , अजुनी  मिटून  घेतलेत  डोळे , तसं  ते  दाखवतंय ,
टाळाटाळ  करून  ST कर्मचाऱ्यांच्या धैर्याची  ते  अजूनही  परीक्षा  पाहातंय  ?

(6)
आमच्या  एका -एका  "रक्ताच्या"  थेंबाचे  सरकारने  मोल  जाणावे  !
म्हणती , हे  आमचे  "रक्त -दान" , रक्त -बलिदान , व्यर्थ  न  जावे  !
लाल  आहे  रंग  "रक्ताचा" , त्यास  गंध  नाही  मुळीच  विद्रोहाचा ,
प्रामाणिक प्रयत्न आहे  आमचा , आम्हा  आमचे  अधिकार  मिळण्याचा  !


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.01.2022-बुधवार.