वृक्ष-वाचवा-चारोळ्या-"५५हजार कोटींच्याहिऱ्यांपोटी,गावकरी झोपताहेत आज उपाशी पोटी"

Started by Atul Kaviraje, January 20, 2022, 01:38:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

 विषय :बक्सवाहI  जंगलात  ५५  हजार  कोटींच्या  हिऱ्यांसाठी  जंगल -तोड  सुरु
                       वास्तव  वृक्ष-वाचवा-चारोळ्या
   "५५ हजार कोटींच्या हिऱ्यांपोटी,गावकरी झोपताहेत आज उपाशी-पोटी"
-----------------------------------------------------------------------


(1)
माझा  भारत  देश  विविधतेने  नटलेला
अगणित  संपत्ती  आपल्या  कुशीत  दडवलेला
आज  भू -मातेच्या  मातीवरच  खोदकाम  चाललेय ,
"बक्सवाहI"  गावात  वृक्षांची  कत्तल  होतेय .

(2)
"५५  हजार  कोटींचे  हिरे"  दडलेत  या  वृक्ष -राईच्या  मुळांशी   
अगणित  संपत्तीच्या  हक्कांसाठी  चाललीय  चढाओढ
जंगल -तोड , वृक्ष -तोड  हाच  आहे  एक  पर्याय ,
या  जंगलावर  निर्भर  राहाणाऱ्या  "गावकऱ्यांची"  चाललीय  कुतरओढ .

(3)
हे  जंगल  त्यांचा  पिता , हे  वन  त्यांची  माता
पोटा -पाण्याचे , जगण्याचे  साधन  या  वृक्षांनीच  त्यांना  दिले
त्यांचा  सहारा , त्यांचे  जीवन  कंत्राटदार  हिरावून  घेताहेत ,
निर्दयपणे  या  "हिऱ्यांसाठी" , ते  झाडांवर  कुऱ्हाड  चालवताहेत .

(4)
निसर्गाने  दिलेली  हि  अगणित ,अमूल्य  वृक्षरूपी  संपदा
याची  चमक  दमक  येणार  आहे  का  त्या  "हिऱ्यांस"  ?
क्षणार्धात  होतील  निष्प्रभ  सारे  ते  या  वृक्षांच्या  तेजापुढे ,
कवडीमोल  ठरतील  ते  डोळे  दिपवणाऱ्या  या  अफाट  जंगल -संपत्तीपुढे  !

(5)
वृक्ष -प्रेमींना  एक  कळकळीचे  मनापासून  आवाहन  माझे
कसंही  करून  "बक्सवाहाचे"  जंगल  सांभाळा ,वृक्ष  वाचवा
जिच्यावरच  होतोय  निर्वाह  गरिबांचा ,वस्ती  राहिलीय  उभी ,
आशीर्वाद  मिळेल  तुम्हा  त्यांचा  अन   या  सजीव  डोलणाऱ्या  वृक्षांचा .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.01.2022-गुरुवार.