IIश्री गणेशाय नमःII-"श्री गणेश संकष्टी चतुर्थी"-गणेश चतुर्थी शुभेच्छा

Started by Atul Kaviraje, January 21, 2022, 12:13:10 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                         II श्री गणेशाय नमः II
                                        "श्री गणेश संकष्टी चतुर्थी"
                                      ------------------------
                                             
मित्र/मैत्रिणींनो,

     आज  दिनांक-२१.०१.२०२२-शुक्रवार , संकष्टी चतुर्थीचा पावन दिन आहे . श्री गणेश चरणी वंदन करून, देऊया गणेश चतुर्थीच्या हार्दिक  शुभेच्छा--


                                      गणेश चतुर्थी शुभेच्छा
                                    --------------------

     आपल्याकडे गणपती बाप्पावर श्रद्धा असणारे अनेक जण सापडतील. गणपती बाप्पा हे अनेकांचे श्रद्धास्थान आहे. अगदी आपल्या लहान बाळांची नावेदेखील गणपती बाप्पाच्या नावावरून ठेवली जातात. अनेक जण दर महिन्यात येणाऱ्या संकष्टीला उपवास करतात. संकष्टी (Sankashti Chaturthi In Marathi) हा प्रत्येक गणेशभक्तासाठी खास दिवस आहे. या दिवशी बाप्पावर श्रद्धा ठेऊन उपवास केला जातो. तसंच काही जण उपवासाचे पदार्थ खाऊन हा दिवस साजरा करतात तर काही जण निर्जळी उपवासही करतात. संकष्टी (Sankashti Chaturthi 2022 In Marathi) आणि अंगारकी संकष्टी हे दोन्ही दिवस गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी नक्कीच भावपूर्ण असतात. संकष्टीच्या शुभेच्छा (Sankashti Chaturthi Wishes In Marathi) भक्तांना देण्यासाठी काही खास कोट्स आणि संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा (Sankashti Chaturthi Chya Hardik Shubhechha). तुम्हीही तुमच्या प्रियजनांना संकष्टी चतुर्थी मराठी शुभेच्छा (Sankashti Chaturthi Shubhechha) पाठवू शकता.

     संकष्ट चतुर्थी ही सर्वांसाठीच खास असते. दर महिन्याच्या चतुर्थीला गणपतीची खास पूजाअर्चा केली जाते आणि बाप्पासाठी उपवास ठेवला जातो. आपल्याला जे काही मिळालं आहे ते आपली मेहनत आणि बाप्पाची कृपा यामुळेच हे झालं आहे असा अनेकांचा समज असतो आणि त्यासाठीच हा उपवास करण्यात येतो. अशा या पवित्र संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा (Sankashti Chaturthi In Marathi) खास तुमच्यासाठी. तसेच जाणून घ्या गणेश चतुर्थी हार्दिक शुभेच्छा.


1. कितीही मोठी समस्या असू दे देवा तुझ्या नावातच समाधान आहे...
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

2. सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
गणपती बाप्पा मोरया !

3. आजच्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी
सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत या सदिच्छा !

4. संकष्ट चतुर्थीच्या मंगलदिनी तुमच्या मनोकामनI पूर्ण होऊ द्या!
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !

5. संकष्टी चतुर्थीनिमित्त आपणा सर्वांना
आणि आपल्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा!
तुमच्या मनातील इच्छित कामना
श्रीगणरायाकडून पूर्ण होवोत हीच प्रार्थना !

6. सकाळ हसरी असावी, बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी
मुखी असावे बाप्पाचे नाम, सोपे होईल सर्व काम
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

7. बाप्पाचा नेहमी तुमच्या डोक्यावर हात असो
नेहमी तुम्हाला बाप्पाची साथ मिळो,
संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !

8. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

9. बाप्पाचे रूप आहे निराळे
येता कोणतेही संकट येतो धाऊनी कायम
त्याने सांभाळले म्हणूनच तर सर्व काही अजूनही नीट आहे
सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !

10. रम्य ते रूप सगुण साकार,
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अंतरंगी भरूनी येत असे गहिवर,
विघ्न नष्ट व्हावे पूजता गजेंद्र विघ्नेश्वर
– संकष्टी चतुर्थीच्या शुभेच्छा !


--दीपाली नाफडे
---------------

                   (साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी.popxo.कॉम)
                 -----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.01.2022-शुक्रवार.