आंदोलन-चारोळ्या-"एकअनोखे आंदोलनSTकर्मचाऱ्यांचे,आगारात वस्तरेचालताहेत नाव्ह्यांचे

Started by Atul Kaviraje, January 22, 2022, 01:32:42 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

    विषय : बीड  येथे  ST कर्मचाऱ्यांनी  सरकारचा  निषेध  करत  मुंडन  केले
                वास्तव  ST कर्मचारी  सरकार  निषेध  आंदोलन  चारोळ्या
      "एक अनोखे आंदोलन ST कर्मचाऱ्यांचे,आगारात वस्तरे चालताहेत नाव्ह्यांचे"
   -------------------------------------------------------------------


(1)
ST बस  आगाराचे  "सलूनमध्ये"  झालेय  रूपांतर
वाहक -चालकांच्या  डोक्यावरून  चालतेय  "नाव्ह्याची  कातर"  भराभर
आणिक  एक  हे  अनोखे  आंदोलन  सरकारच्या  निषेधाचे ,
"मुंडन"  करून  वाहक -चालक  मागताहेत , सरकारकडे  आपला  अधिकार .

(2)
जो  तो  उठतोय  "केस"  कापतोय , "केश" -वपन  करतोय , "मुंडन"  करतोय
कसली  आलीय  ही  आंदोलनकरींमध्ये  "केस"  कापण्याची  लाट  ?
यापूर्वी  हे  कधी  घडले  नव्हते , कधी  पाहिलेही  नव्हते ,
असो , "नाव्ह्यांचीं"  मात्र  निखालस  होतेय  यामुळे  खूपच  भरभराट .

(3)
संबंध  काय  "मुंडनाचा" , आणि  सरकार  निषेध  आंदोलनाचा  ?
काहीतरी  सुचत  जाते  आणि  विपरीत  घडते , विनाकारण
आंदोलन  करण्याचे , निषेध  दर्शविण्याचे  इतरही  मार्ग  आहेत  बरेच ,
या  उपायाने येईल  का  सरकार  वठणीवर , वाटतंय  तुम्हा  खरेच  ?

(4)
आता  "नाव्ह्यांना"  दर  तीन  महिन्यांनी  बस  आगारात  आमंत्रण  असते
वाहक -चालकांचा  जुना -नवीन  गट  "मुण्डनIस" तयार  असतो
आंदोलनाचा  काहीच  होत  नाही  परिणाम ,  सरकार  नाही  बधत ,
म्हणती  कर्मचारी , जोवर  सरकार  नाही  बधणार , तोवर  आम्हीही  नाही  सुधारत .

(5)
हे  सरकार  काही  कामाचे  नाही , हे  सरकार  पडत  का  नाही  ?
मागण्या  मान्य  करीत  नाही , याचे  आमच्याकडे  लक्षच  नाही
आणि  हताशपणे  ST कर्मचारी  विचार  करीत  बसलेत  "मुंडन"  करून ,
नवीन  सरकार  येण्याची , आणि  अधिकार  प्राप्त  होण्याची  वाट  पाहात  राही  ?


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.01.2022-शनिवार.