II श्री सुरेश वाडकर II-"दिस जातील, दिस येतील"

Started by Atul Kaviraje, January 22, 2022, 06:55:57 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                     II श्री सुरेश वाडकर II
                                    ----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      आज ऐकुया श्री सुरेश वाडकर यांनी गायलेलं चित्रपटातील एक सुप्रसिद्ध गीत. सुरेश वाडकर एक मराठी गायक आहेत. त्यांनी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. ते भावगीते, भक्ती गीते आणि अन्य सुगम संगीतही गातात. आजच्या गाण्याचे बोल आहेत-"दिस जातील, दिस येतील"

                                  "दिस जातील, दिस येतील"
                                 -------------------------


तुझ्या माझ्या संसाराला आनि काय हवं
तुझ्या माझ्या लेकराला, घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नविन घडंल
घरकुलासंग समदं येगळं होईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल.

अवकळा समदी जाईल निघूनी
तरारलं बीज तुज माझ्या कुशीतूनी
मिळंल का त्याला, उन वारा पानी
राहिल का सुकंल ते तुझ्या माझ्या वानी
रोप आपुलच पर होईल येगळं
रोप आपुलच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळं
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल.

ढगावानी बरसंल त्यो,
वार्यावानी हसवंल त्यो
ढगावानी बरसंल त्यो,
वार्यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखविल, काट्यालाबी खेळविल
समद्या दुनियेचं मन रिझविल त्यो
आसंल त्यो कुनावानी,
आसंल त्यो कुनावानी कसा गं दिसंल
तुझ्या माझ्या जीवाचा त्यो आरसा असंल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल.

उडूनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहांटच्या दंवावानी तान्हं तुजं-माजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल
दिस जातील, दिस येतील
भोग सरंल, सुख येईल.

===================
गीतकार : सुधीर मोघे
गायक : आशा भोसले , सुरेश वाडकर
संगीतकार : सुधीर फडके
चित्रपट : शापित (१९८२ )
===================

--संकलक-रवी पवार
-------------------

           (साभार आणि सौजन्य-सुरेश वाडकर के 100 गाने-सारेगम मराठी)
                             (संदर्भ-एस. मुळे.कॉम-यू ट्यूब.कॉम)
         -------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.01.2022-शनिवार.