लशीकरण चारोळ्या-"लशीकरण करा,लस घ्या कंपलसरी,नाहीतर तुमच्या पगाराला लागेल कातरी"

Started by Atul Kaviraje, January 23, 2022, 01:34:16 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   विषय : नागपूर  येथे , लस  न  घेतलेल्या  कर्मचाऱ्यांचे  पगार  थांबविले ,थकविले .
                 वास्तव -कोरोना  लशीकरण  अभिनव  योजना  चारोळ्या
     "लशीकरण करा,लस घ्या कंपलसरी,नाहीतर तुमच्या पगाराला लागेल कातरी"       --------------------------------------------------------------------------


(1)
कोरोना  आपल्या  सह -कुटुंब ,परिवारा -सह ,जगभर  उच्छाद  मांडत  चाललाय
दररोज जन्म घेणाऱ्या नवं-नव्या विषाणू  बाळांनी, त्याच्या घरचा पाळणा हलत  राहिलाय
एकचं  उपाय  या  कोरोनास  देशोधडीस लावण्याचा , त्याच्या  कुटुंबासह ,
"लशीकरण"  आहे  एकचं  अमोघ  अस्त्र ,शस्त्र  जणू  अजोड  भीष्म  पितामह .

(2)
कुणी  लस  घेताय ,तर  कुणी  बिचकतयं ,घाबरतंय , तर  कुणी  पळ  काढतंय
गैरसमज  आहेत  समाजात  अजुनी , लस  नाही  घेतली  तर  काय  होतंय  ?
"लशीकरणापासून"  आहे  वंचित  बहुतांशी  जनता , या  समजास बळी  गेलेली   ,
अन  अंती  कोरोनाच्या  भक्ष -स्थानी  पडून , आपल्या  जीवासच  मुकलेली .

(3)
१३५  कोटी  जनतेचा  लसवंत  १०० % पूर्ण  होण्यास  विलंब  होतोय
नवीन  कठोर  कायद्याचा  आता  नागपुरात  अवलंब  होतोय
सरकारने  आणलीय  त्यांच्या "पगारावर"  गदा , "पगार"  थांबवीत ,थकवीत  चाललीय ,
"लशीकरण"  करा , अथवा  या  महिन्याच्या  "पगारात"  तुमच्या  कपातच  होईल  !

(4)
काहीतरी  नवं  आहे  हे , अनोखे  पाऊल  उचललं  गेलंय  नागपुरात
"लशीकरण"  नाही  तर  "पगार"  नाही , चर्चा  सुरु  आहे  कचेरीत , जोरा -जोरात
दोन्ही  डोस  घ्या ,लसवंत  व्हा ,अन  तुमचा  थकीत  "पगार"  घेऊन  जा ,
अन्यथा , कोरोनाचा  ग्रास  व्हा , एकही  घास  न  घेता  उपाशीच  मरा  !

(5)
कोरोनाने  खूप  काही  घडवलेत  बदल , मानवाच्या  सामर्थ्यात , बुद्धीत
नाहीतर  असे  काही  आगळे -वेगळे  विचार , कधीच  नव्हते  उद्भवत  मानव -मेंदूत
कोरोनाने  खूप  काही  शिकवलंय , धडा  दिलाय ,मानवाचे  जीवन  बदललंय ,
पूर्वी एकमेकांपासून दूर-दूर राहणारI माणूस,आज जवळ आलाय,तो पूर्णपणे बदललाय .

(6)
"पगाराचे"  फक्त  निमित्त  आहे , कोणी  तुमचा  "पगार"  कापत  नाहीत
तुमच्या  सुरक्षेसाठी ,स्वास्थ्यासाठीच  ठोस  पाऊले  सरकार  आहे  उचलीत
तेव्हा  शहाणे  व्हावे  जनतेने , त्वरित  "लशीकरण"  करावे , स्वतःला  सुरक्षित  ठेवावे ,
उत्तम स्वास्थ्य राखून, नव्या जोमाने,उमेदीने कामास लागावे, एक चांगले आयुष्य जगावे .


-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.01.2022-रविवार.