"वंध्यत्त्व आता अभिशाप बिलकुल नIही,दुसऱ्या गर्भाशयात स्वतःचा अंश वाढत राही"

Started by Atul Kaviraje, January 26, 2022, 01:12:35 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

     विषय : SURROGACY PREGNANCY (अपत्य -प्राप्तीसाठी  अन्य  गर्भाशय  भाड्याने  घेणे )
                आधुनिक  MEDICAL-SCIENCE वरदान  चारोळ्या
   "वंध्यत्त्व आता अभिशाप बिलकुल नIही,दुसऱ्या गर्भाशयात स्वतःचा अंश वाढत राही"
--------------------------------------------------------------------------


(1)
अनोखे  वरदान  या  आधुनिक  MEDICAL SCIENCE-चे  मिळालंय  मानवास
अपत्य -प्राप्तीस  इच्छित , या  निःसंतान  जोडप्यास  मिळालंय  एक  वरदान
पण  आता  नाही  राहिलंय  "वंध्यत्त्व"  एक  श्राप  अभिशाप ,
SURROGACY माता  धावून  आलीय , वाढवत  त्यांचा  "अंश"  उदरात  !

(2)
कितीतरी  आतुर ,उत्सुक  आहेत  जोडपी  अपत्य -मुख -सुखासाठी
पण  आहेत  वंचित , काहीतरी  कमी  आहे , संतान  प्राप्तीसाठी
आज  "गर्भाशयही"  भाड्याने  मिळू  लागलंय , त्यांचा  "वंश"  लागलाय  वाढू ,
एक  आशेचा  किरण  त्यांना  दाखवून , त्यांच्या  "वंशाचा"  दिवा  उदरात  वाढवून .

(3)
आज  या  मुला-मुलींना  दोन  माता  मिळाल्यात
एक  खरी  माता , अन  दुजी  जिने  त्यांना  जन्म  दिलाय
या  मुला -मुलींचा  जन्म  खरोखर  आहे  भाग्याचा ,
माणुसकीचे , मनामनाचे ,परोपकारी  नात्याचे  दर्शन  घडण्याचा .

(4)
आज  या  "गर्भांना"  मायेची  उब ,ममतेची  कूस  मिळालीय
त्यांच्या  दोन्ही  मातांनी  त्यांची  योग्य  काळजी  वाहिलीय
एका  स्त्रीने  दुसऱ्या  स्त्रीचे  दुःख  जाणले  आहे ,
तिचा  "अंश-वंश"  आपल्या  पोटात  वाढवून , तिला  आईपण  दिले  आहे .

(5)
आईशिवाय  मूल , व  मुलाशिवाय  आई , संकल्पना  अपूर्ण  आहे
SURROGACY-ने  त्यांना  मातृत्त्वाचे  वरदान  दिलंय , पूर्णत्त्वास  नेलंय
आज तिच्या नयनांत पाणी आहे ,ती समाधानी आहे ,तिच्या  कुशीत  तिचे  बाळ  आहे ,
या आधुनिक विज्ञानाची ती ऋणी आहे,या SURROGACY-ची हीच संपूर्ण कहाणी आहे .


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.01.2022-बुधवार.